आज श्रीरामपूर लिंबूनी बुद्धविहार येथे मोफत आरोग्य तपासणी शिबिर

श्रीरामपूर (बाबासाहेब चेडे ) : श्रीरामपूर लिंबूनी बुद्ध विहार डॉ बाबासाहेब आंबेडकर स्मारक रेल्वे स्टेशन जवळ येथे टॉप टाईम आयुर्वेद यांच्या वतीने जर्मन टेक्नॉलॉजी मशिनच्या सहाय्याने आज रोजी सकाळी 10 वाजेपासून सायंकाळी 5 वाजेपर्यंत मोफत आरोग्य तपासणी व सल्ला शिबीर आयोजित करण्यात आले आहेे.

या शिबिरात आरोग्य फ्री चेकअप करण्यात येणार आहे. शिबिरात शांताराम भवर, सौं सुनीता भवर, सोपान पानझडे, अतुल जगताप आदी मार्गदर्शन करणार आहे. तरी या शिबिराचा लाभ घेण्यासाठी सुगंधराव इंगळे मोबाईल क्र 9420796531, अशोकराव बागुल 9970258400, चंद्रकांत खरात 8767947090 यांच्याशी संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात येत आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या