अफसर शेख/बालानगर : पैठण तालुक्यातील बालानगर येथे ना. जयंत पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त हिंदुस्तान क्रिकेट क्लब युट्युब लाईव आयोजित बालानगर प्रीमियर लिगच्या अंतिम सामन्यात दोन चेंडूत सात धावांची गरज असताना दत्ता उर्फ डिजे यांने षटकार मारून महाकाळा संघाला पाचोड सरपंच क्रिकेट च्या विरुद्ध रोमहर्षक विजय मिळवून दिला.
दहा दिवस चाललेल्या या लिगमध्ये ग्रामीण भागातील अनेक संघांनी सहभाग नोंदवला. या स्पर्धेसाठी जिल्हा परिषद सदस्य विजय चव्हाण यांनी प्रथम क्रमांकाचे तब्बल ५१ हजार रुपयांचे पारितोषिक दिले. तर दुसऱ्या क्रमांकाचे पारितोषिक पी.आर.थोटे यांनी दिले.
चव्हाण यांच्या अनुउपस्थितीमध्ये राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे जिल्हा सरचिटणीस प्रा.दिनेश पाटेकर, अफसर शेख, एजाज शेख, भास्कर गोर्डे, नजीर शेठ, प्रविण गोर्डे, कैलास गोर्डे, सोमनाथ भालेकर, अरुण तांबे, बद्री तांबे यांच्या हस्ते स्पर्धेतील विजेत्यांना बक्षिस वितरण करण्यात आले. ही स्पर्धा यशस्वी करण्यासाठी सोमनाथ तुपे, शाहिद शेख, मुक्तार शेख, रईस शेख, शिवाजी औसारे, राम गोर्डे, सौरभ इंगळे, गणेश भाग्यवंत, अमर गोर्डे यांनी अथक परिश्रम घेतले.
0 टिप्पण्या