आर्यनंदी महाराज जन्मजयंती सोहळ्याचे आयोजन

पैठण : तालुक्यातील ढोरकीन येथे सालाबादाप्रमाणे होळीच्या दिवशी गुरुवारी (दि.१७) रोजी प. पू. १०८ आचार्य श्री. आर्यनंदीजी महाराज यांच्या जन्मजयंती सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे. यामध्ये गुरूवारी सकाळी आठ वाजता ध्वजारोहन होनार असून नंतर दिगंबर जैन मंदीर येथुन शोभायात्रा, आल्पोपहार, अभिषेक व नंतर दुपारी मान्यवरांचे मनोगत व नंतर दोन ते पाच महाप्रसाद आदी कार्यक्रम होणार आहेत. 

हा कार्यक्रम प. पू. १०८ आचार्यश्री पवित्रसागरजी महाराज व संघ यांच्या आशिर्वादाने मोठ्या उत्साहात साजरा होत असुन कार्यक्रमाचे उद्घाटन अखिल दिगंबर जैन सैतवाळ संस्था मुंबईचे राष्ट्रीय अध्यक्ष दिलीप घेवारे, राष्ट्रीय उपाध्यक्ष रमेश रनदिवे, निखिल नखाते, स्वीय सहाय्यक मंत्रालय श्रीकांत काळे यांच्या हस्ते होणार असुन या कार्यक्रमास रोजगार हमी व फलोत्पादन मंत्री संदीपान भुमरे, माजी अर्थ व बांधकाम सभापती विलास भुमरे, माजी आमदार भाऊ थोरात, शिवसेना उपजिल्हाप्रमुख विनोद पा. बोंबले, तालुका उपप्रमुख मनोज पा. पेरे व पांडुरंग पा. मुळे यांच्यासह विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित राहणार आहे.

या कार्यक्रमास रायचंद भुस, सुधाकर वायकोस, रामदास गोसावी, वर्धमान वायकोस, अशोक भुस, किशोर तासकर, राजेंद्र इंदोरे, महावीर इंदोरे आदिंचे मार्गदर्शन लाभत असुन या भव्य सोहळ्याचा लाभ घ्यावा असे आवाहन भारत इंदोरे, महाविर भुस, कुलभूषण उखळकर, रविंद्र भुस, शेखर इंदोरे, जयकुमार भुस, दिलीप ढोकर, नंदु इंदोरे, दिलीप वायकोस, संतोष संघई आदी सकल दिगंबर जैन समाज बांधवांच्या वतीने करण्यात आले आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या