संगमनेर/ बाळासाहेब भोर : ऐतिहासिक व नैसर्गिक वारसा लाभलेल्या स्वराज्याची संकल्पभूमी असलेल्या पेमगिरीत शहागड युवा प्रतिष्ठानच्या वतीने आयोजित भव्य कुस्त्यांचा सामना पार पडला.
सध्याच्या ऑनलाईन युगात पारंपरिक खेळ, परंपरा, संस्कृती यांची जपणूक व्हावी यासाठी या कुस्त्यांचा कार्यक्रम ठेवण्यात आला होता. या कुस्त्यांच्या कार्यक्रमाला आजपर्यंतचा इतिहास बघता खुप गर्दी उसळली होती. कोरोनानंतर प्रथमच अनेक दिवसांनंतर असा भव्य दिव्य असणाऱ्या या जंगी हंगाम्याला प्रेक्षकांनी भरभरून प्रतिसाद दिला. अहमदनगर, कोल्हापूर, नाशिक या जिल्ह्यांतील, तसेच पेमगिरी आणि पंचक्रोशीतील अनेक नामांकित मल्ल या सामन्यात भाग घेण्यासाठी आले होते. अखेरच्या दोन्ही महत्वाच्या कुस्त्या पेमगिरीचे नावाजलेले पैलवान मनोज चव्हाण व गणेश डुबे यांनी जिंकल्यामुळे एकच जल्लोष झाला. शहागड युवा प्रतिष्ठानच्या वतीने दरवर्षी शिवजयंती मोठ्या उत्साहात व विविध सामाजिक उपक्रमांनी साजरी केली जाते तसेच यापुढेही सर्वसामावेशकतेलाच प्राधान्य देऊन विविध उपक्रम राबविण्याचा प्रतिष्ठानचा मानस आहे.
या कार्यक्रमप्रसंगी सतीशराव कानवडे, डॉ.सोमनाथ कानवडे, रावसाहेब डुबे, बाळासाहेब कानवडे, मिलिंद टपाल, खंडू जेडगुले, विष्णु डुबे, ज्ञानदेव सहाणे आदी प्रमुख मान्यवर तसेच पेमगिरी व पंचक्रोशीतील आजी माजी पैलवान, शहागड युवा प्रतिष्ठानचे सर्व सदस्य व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.
0 टिप्पण्या