उंदिरगाव येथे शिधापत्रिका वाटप सोहळा संपन्न

श्रीरामपूर/ बाबासाहेब चेडे : उंदिरगाव येथे आदिवासी समाजातील व्यक्तींना शिधापत्रिका वाटप कार्यक्रम पार पडला. कार्यक्रमास श्रीमती राजश्रीताई जयंतराव ससाणे, सिद्धार्थ मुरकुटे, सचिन गुजर, बाबा दिघे यांची प्रमुख उपस्थिती होती. 

या कार्यक्रम प्रसंगी सुरेश पा गलांडे, राजेंद्र पा पाऊलबुद्धे, सरपंच सुभाष बोधक, उपसरपंच रमेश गायके, राजू गिरहे, विरेश गलांडे, बाळासाहेब नाईक, प्रकाश ताके, बाळासाहेब पडोळे, दत्तात्रय गुळवे, बाळासाहेब निपुनगे, शिवाजी भालदंड, मच्छिंद्र आढाव, मच्छिंद्र वाघ, सुनील शिनगारे, सोपान नाईक, बाबासाहेब नाईक, सुभाष शिंदे, सुरेश शिंदे, दत्तात्रय 
नाईक, निलेश बर्डे, अमोल नाईक उपस्थित होते.
आदिवासी समाजातील लोकांना शिधापत्रिका मिळवून देण्याच्या कामात अनेक अडचणी पार कराव्या लागल्या. त्यासाठी दिलीपराव मोरे, लहानु मोरे यांनी कठोर परिश्रम घेतले. या कामी कागद पत्रांची पूर्तता करण्यात त्यांना पवन पाऊलबुद्धे यांच्या अभ्यासाची विशेष मदत लाभली. दोघांच्या कामाची पावती म्हणून प्रमुख पाहुणे आणि ग्रामस्थ यांच्या कडून दिलीपराव मोरे व लहानुभाऊ मोरे यांचा सत्कार करण्यात आला. कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी मंजाबापू नाईक होते तर सूत्र संचालन राजू नाईक यांनी केले.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या