अहमदनगर/ जावेद शेख : चर्मकार संघर्ष समिती संस्थापक अध्यक्ष शिवाजीराव साळवे यांच्या मार्गदर्शनाखाली आणि विशेष प्रयत्नांतून राज्यभर समाज बांधवांचे तालुका व जिल्हास्तरीय मेळाव्यांचे आयोजन करुन संघटन मजबूतकरणासाठी विविध सामाजाभिमुख उपक्रम राबवत तालुकास्तरावर पदाधिकाऱ्यांच्या नियुक्या केल्या जात आहे. त्याचाच एक भाग म्हणून सुरेश सावळेराम शेंडे रा.नेवासा फाटा यांच्या निवासस्थानी शनिवार दिनांक १२/०३/२०२२ रोजी नुकताच नेवासा तालुकास्तरीय बैठकीचे आयोजन करुन पदाधिकाऱ्यांच्या नियुक्त्या करण्यात आल्या.
यावेळी नेवासा तालुक्यातील समाज बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते. चर्मकार संघर्ष समिती महाराष्ट्र राज्य या संस्थेचे जिल्ह्यातील प्रत्येक तालुक्यामध्ये समाज बांधवांच्या मेळाव्याचे नियोजन टप्प्याटप्प्यांनी करण्यात येत आहे. त्यात प्रथमतः श्रीरामपूर या ठिकाणी समाज बांधवांचा मेळावा घेण्यात आला होता. त्या मेळाव्यास समाज बांधवांचा अतिशय उत्तम प्रतिसाद देखील मिळाला. त्या प्रमाणेच इतर तालुक्यात देखील तसाच वा त्यापेक्षा अधिक प्रमाणात प्रतिसाद मिळत असल्याने समाज जागृत होत असल्याचे दिसून येते आहे. नेवासा तालुक्यातील समाज बांधवांची या बैठकीस उस्फूर्तपणे प्रतिसाद मिळाला. समाजाचे प्रश्न, अडीअडचणी, भविष्यात येणारी संकटे या विषयावर चर्चा होऊन श्रीरामपूर तालुकाध्यक्ष संजय दळवी,नेवासा तालुकाध्यक्ष एकनाथ राऊत, सामाजिक कार्यकर्ते सोमनाथ कुंडलीक शेंडे, सौ.मेघा नवघरे तसेच इतर मान्यवरांनी समाजातील विविध समस्यांवर आपले मत मनोगत व्यक्त केले.
सदरील बैठक हसत-खेळत मोठ्या आनंदी आणि उत्साही वातावरणात पार पडली. सर्व समाज संघटित झाल्यास भविष्यात होणारे फायदे यावर चर्चा करण्यात आली. सर्वांना संघटनेची ध्येय, धोरणे, फायदे आणि अजेंडा समजावून सांगण्याचा प्रयत्न करण्यात आला. तथा बैठकीत तालुक्याची कार्यकारणी जाहीर करण्यात आली. नेवासा तालुका कार्यकारिणी अध्यक्षपदी सुरेशराव सावळेराम शेंडे, तालुका उपाध्यक्षपदी माणिक आसाराम शेंडे, विशाल भाऊराव नवघरे, ज्ञानदेव बापूराव झिंजुर्डे, संघटकपदी विनायक आसाराम शेंडे, किशोर भानुदास म्हैसमाळे, भाऊसाहेब रामभाऊ भोसले, मोतीराम रावसाहेब शेंडे, ज्येष्ठ सल्लागारपदी एकनाथ बाबासाहेब राऊत, खजिनदारपदी संजय कचरू झिंजुर्डे, कार्याध्यक्षपदी सोमनाथ कुंडलीक शेंडे, महिलाध्यक्षापदी सौ.मेघा सुरेश नवघरे, उपाध्यक्षापदी सौ.सकूबाई राजेंद्र तेलोरे, वैशाली दिगंबर शेंडे, संघटक सौ.ज्योती संतोष शेंडे आदींच्या निवडी करण्यात आल्या.
या कार्यक्रमास दिलीप शेंडे (जिल्हा संघटक), संजय दळवी (अध्यक्ष श्रीरामपूर), जगन्नाथ भागवत तेलोरे (सचिव), आदी प्रमुख उपस्थिती होती. यावेळी समाजातील ज्येष्ठ मान्यवरांच्या हस्ते सर्व नुतन पदाधिकाऱ्यांचा सत्कार करण्यात आला.
0 टिप्पण्या