स्वयंसिद्ध संस्थेकडून महिला दीनानिमित्त नारी शक्तीचा सन्मान

विवीध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या महिलांना केले सन्मानित
अहमदनगर/ जावेद शेख : स्त्री- ही आदिशक्तीचे रूप आहे त्यांची ताकद ही अद्वितीय असून त्यांच्यासमोर कोणतेही दुसरी ताकत असू शकत नाही अशा शब्दात योगगुरु अनिल कुलकर्णी यांनी महिला दिनाच्या निमित्ताने घेण्यात आलेल्या कार्यक्रमात महिलांचे कौतुक केले ८ मार्च महिला दिन सर्वत्र साजरा झाला या दिनाचे औचित्य साधत स्वयंसिद्ध युवा स्वंयम रोजगार मार्गदर्शन व प्रशिक्षण संस्था श्रीरामपूर यांच्या वतीने समाजात विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या सहा महिलांना स्वयंसिद्ध हा पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले. यावेळी कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी मालपाठक मॅडम होत्या तर प्रमुख उपस्थितीमध्ये अनिल कुलकर्णी, ज्येष्ठ उद्योजक पद्मनाथ जोशी, नगरपालिकेच्या पाठक, मॅडम स्वयंसिद्धाच्या संचालिका अनिता आहेर, किरण घोलप आदी मान्यवर उपस्थित होते.

कुलकर्णी सरांनी जीवनातील आईस्क्रीम चा अर्थ समजावून सांगितला. आ- आकलनशक्ती, ई-इच्छाशक्ती, स-सहनशक्ती, क्री- क्रियाशीलता, म- मनाचा मोठेपणा या सर्वच बाबींवर आपण लक्ष दिलं तर आपण जीवनात यशस्वी होऊ शकतो असे योगगुरू कुलकर्णी यांनी सांगितले. डॉ.पूजा जोशी(वैद्यकीय क्षेत्र), कल्पना वाघुंडे (सामाजिक क्षेत्र), प्रियंका यादव (पत्रकारिता क्षेत्र), मंजुषा ढोकचौळे (राजकीय क्षेत्र), कविता कडू (गृह उद्योग), ताराबाई पंडित (सेवा क्षेत्र) अश्या विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या महिलांना स्वयंसिद्ध पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले. कार्यक्रमात वाघुंडे, जोशी आदींची भाषणे झाली.

यावेळी पुरस्काराला उत्तर देताना उपसरपंच मंजुषा ढोकचौळे, डॉ.पूजा जोशी, प्रियांका यादव यांनी आपली मनोगते व्यक्त केली या झालेल्या कार्यक्रमात विविध बचत गटाच्या अध्यक्षा सचिव आणि सदस्या मोठ्या संख्येने उपस्थित होत्या. कार्यक्रमाचे प्रास्ताविक स्वयंसिद्धाचे किरण घोलप यांनी केले तर सूत्रसंचालन ऍड.प्रवीण जमधडे यांनी केले शेवटी आभार प्रियंका यादव यांनी मानले.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या