एक सक्षम व यशस्वी स्त्री म्हणून आपली जागा समाजात निश्चित करणे काळाची गरज - सौ. वैशाली प्रशांतकुमार पाटील

राहुरी विद्यापीठ : स्त्री प्रत्येक कुटुंबाचा एक महत्वाचा भाग असतो. स्त्री शिवाय कुटुंब पुर्ण होवु शकत नाही. कुटुंबाशिवाय समाज पुर्ण होऊ शकत नाही. आयुष्यात प्रत्येक टप्प्यावर एक स्त्री विविध भुमिका जबाबदारीने पार पाडते. महिलांनी आयुष्यातील प्रत्येक व्यासपीठावर प्रभावीपणे अग्रसेर राहयाला हवे तसेच महिलांनी आपले करियर आणि आपला संसार या दोन्हींचा योग्य समतोल राखणे आवश्यक आहे. तरच ती खर्या अर्थाने एक सक्षम व यशस्वी स्त्री म्हणून आपली जागा समाजात निश्चित करु शकते असे प्रतिपादन सौ. वैशाली प्रशांतकुमार पाटील यांनी केले.

जागतिक बॅक अर्थसहाय्यीत, भारतीय कृषि अनुसंधान परिषद, राष्ट्रीय कृषि उच्च शिक्षण प्रकल्प, नवी दिल्ली यांच्या सयुक्त विद्यमाने हवामान अद्ययावत शेती व जलव्यवस्थापनाचे आधुनिक कृषी विज्ञान व तंत्रज्ञान केंद्र, महात्मा फुले कृषि विद्यापीठ, राहुरी येथे कार्यरत आहे. या प्रकल्पाअंतर्गत आंतराष्ट्रीय महिला दिन साजरा करण्यात आला. या कार्यक्रमास अध्यक्षस्थानावरून सौ. वैशाली प्रशांतकुमार पाटील या बोलत होत्या.

या कार्यक्रमासाठी कास्ट प्रकल्पाचे प्रमुख संशोधक तथा कृषि अभियांत्रिकी विभाग प्रमुख डॉ. सुनिल गोरंटीवार तसेच सहप्रमुख संशोधक डॉ. मुकुंद शिंदे, डॉ. अतुल अत्रे, डॉ. सचिन नांदगुडे, प्रकल्पातील सर्व महिला संशोधन सहयोगी आणि सर्व महिला कुशल/अकुशल कामगार उपस्थित होत्या. या कार्यक्रमात डॉ. सुनिल गोरंटीवार आणि डॉ. मुकुंद शिंदे यांनी उपस्थित सर्व महिला कर्मचार्यांना मार्गदर्शन केले. तसेच डॉ. शुभांगी घाडगे, डॉ. प्रज्ञा जाधव व डॉ. नीलम कोंडविलकर यांनी आपले मनोगत व्यक्त केले. या कार्यक्रमाचे सुत्रसंचालन डॉ. अंजली मुसमाडे व आभार प्रदर्शन डॉ. रजनी साळुंखे यांनी केले.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या