पेमगिरी सोसायटीच्या चेअरमनपदी प्रतापराव डुबे तर व्हा.चेअरमनपदी मनोहर डुबे यांची वर्णी

संगमनेर / बाळासाहेब भोर : तालुक्यातील महत्वपूर्ण समजल्या जाणाऱ्या पेमगिरी विविध कार्यकारी सेवा सहकारी सोसायटीच्या चेअरमनपदी प्रताप राणूभाऊ डुबे तर व्हा.चेअरमनपदी मनोहर रामनाथ डुबे यांची आज बिनविरोध निवड करण्यात आली.

मागील पंचवार्षिक निवडणूकीपासून पेमगिरी सोसायटीची निवडणूक ही बिनविरोध होत आहे. ही एक समाधानकारक बाब आहे. गेली जवळपास दहा वर्ष कै.चांगदेव एकनाथ गोडसे यांनी सोसायटीत यशस्वी चेअरमनपद भूषविले होते. आत्ताच्या नूतन संचालक मंडळामध्ये रमेश बाळासाहेब डुबे, निर्मला आस्तिक कानवडे, वंदना उत्तम दीक्षित, संजय दादाभाऊ चव्हाण, राजाराम विश्वनाथ डुबे, अशोक रामनाथ डुंबरे, शांताबाई सुभाष टपाल, अवतार रावसाहेब डुबे, संजय दत्तू पावसे, समीर तुकाराम कोल्हे, संदीप सोमनाथ डुबे या सर्वांची बिनविरोध निवड करण्यात आली आहे. संचालक मंडळात तरुण वर्गाला तसेच महिला सक्षमीकरण म्हणून तीन महिलांनाही संधी देण्यात आली आहे.

सोसायटीची निवडणूक जाहीर झाल्यापासून पेमगिरीत अनेक नाट्यमय घडामोडीनंतर आज अखेर प्रतापराव राणूभाऊ डुबे यांची चेअरमन व मनोहर रामनाथ डुबे यांची व्हा.चेअरमन म्हणून बिनविरोध निवड करण्यात आल्याने अनेक तर्क वितर्कना पूर्णविराम मिळाला आहे. याप्रसंगी रावसाहेब काका डुबे,सोमनाथ गोडसे, ज्ञानदेव सहाणे, पोलीस पाटील मिलिंद टपाल, निवडणूक अधिकारी श्री चतुरे व पेमगिरीतील ग्रामस्थ उपस्थित होते.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या