कोंढवड येथे जागतिक महिला दिन साजरा

राहुरी : कोंढवड येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत जागतिक महिला दिन साजरा करण्यात आला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी सरपंच आशादेवी म्हसे तर प्रमुख पाहुणे म्हणून क्रांतीसेनेच्या अध्यक्षा भारतीताई म्हसे होत्या. कार्यक्रमाची सुरुवात राजमाता जिजाऊ व क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून करण्यात आली.

कोंढवड शाळा व महिला स्वयंसहाय्यता समुहांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित करण्यात आलेल्या जागतिक महिला दिनानिमित्त शाळेच्या मुख्याध्यापिका सौ सरस्वती खराडे यांनी बोलताना सांगितले की, इन्फोसिस कंपनीच्या संस्थापिका सुधा मुर्ती यांचा आदर्श महिला स्वयंसहाय्यता समुहाने घेऊन त्यांनी उद्योजिका बनावे. ज्यावेळी इंजीनियर असलेल्या मुर्ती ह्या नोकरीसाठी टाटा कंपनीत गेल्या, त्यावेळी त्यांना महिलेंना कामावर घेत नाही असे सांगण्यात आले. त्यातुन त्या निराश न होता स्वतः उद्योजिका बनत अनेक महिलांना नोकरी दिली. अशा प्रकारे यशस्वी महिलांचे उदाहरण देत त्यांनी उपस्थित स्वयंसहाय्यता समुहांच्या महिलांना मार्गदर्शन केले. यावेळी स्वराज्य जननी समुहाच्या अध्यक्षा राधिका मधुकर म्हसे, मंगल म्हसे, भारती पवार, उमा म्हसे आदींनी मनोगत व्यक्त केले. वेदांती जरे व चैताली हिवाळे या बाल महिला शिवव्याखात्यांनी सुंदर असा छत्रपतींचा इतिहास आपल्या भाषणातून व्यक्त केला. त्यानंतर महिलांचा संगीत खुर्ची चा खेळ घेण्यात आला. या खेळात लोकनियुक्त सरपंच आशादेवी म्हसे यांनी महिलांसोबत सहभागी होत खेळाची रंगत वाढवली.
याप्रसंगी क्रांतीसेनेचे राज्य संपर्क प्रमुख मधुकर म्हसे, शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष सुनील हिवाळे, सुरेशराव म्हसे, सरिता म्हसे, रोहिणी म्हसे, कांचन म्हसे, शांताबाई म्हसे, अनिता पाले, प्रतिभा हिवाळे, कमलबाई म्हसे, सुवर्णा म्हसे, मीना म्हसे, गायत्री पवार आदींसह शिक्षकवृंद दिलीप वरपे, विजय कदम, शिवाजी कुलट, बाळकृष्ण देवरे, भागवत पुंड, बाळू आमले, स्वयंसहाय्यता महिला समुहांचे सदस्य व विद्यार्थी उपस्थित होते.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या