त्रिदलच्या मध्यस्तीने माजी सैनिकास मिळाला न्याय

अहमदनगर/ जावेद शेख : सन २०१२ पासून खंडाळा गावातील माजी सैनिक अमित देशमुख यांच्या घराकडे जाणाऱ्या रस्त्यावर स्थानिक लोकांनी मोठ्या प्रमाणात अतिक्रमण केलेले होते. त्यामुळे शेतात निघालेला माल घराकडे घेऊन जाता येत नसे. जवळजवळ ३०० मीटर डोक्यावर घेऊन जावा लागत असे. ग्रामपंचायतीच्या माध्यमातून अनेक वेळा रस्त्यावरील अतिक्रमण काढण्याचा प्रयत्न केला परंतु अधिक्रमण धारक ऐकायलाच तयार नव्हते.

जिल्हा प्रशासनाच्या माध्यमातून दिनांक ८ फेब्रुवारी पासून सुरू झालेल्या अमृत जवान सन्मान अभियान आणि स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव साजरा होत असताना या अभियाना अंतर्गत सैनिक संघटनेने ग्रामपंचायतीच्या अधिकाऱ्यां बरोबरच चर्चा केली व अभियानाबाबत माहिती दिली. त्याआधारे सैनिक संघटना आणि ग्रामपंचायतीचे पदाधिकारी, सरपंच अशोकराव पवार, उपसरपंच संदीप विघावे, माजी उपसरपंच मनिषाताई ढोकचौळे यांनी अतिक्रमण केलेल्या संबंधित व्यक्तीस बोलावून समज दिली व संबंधित व्यक्तीने देखील मोठ्या मनाने व सामंजस्य पनाने जिल्हा प्रशासनाच्या या अभियानास, गावच्या ग्रामपंचायतीस व त्रिदल सैनिक संघटनेस सहकार्य करून ५ फुट असलेला रस्ता १२ फुट करून दिला.

याप्रसंगी खंडाळा गावचे सरपंच अशोकराव पवार, उपसरपंच संदीप विघावे, माजी उपसरपंच मनिषाताई ढोकचौळे, अशोक रंधे, त्रिदल सैनिक संघटनेचे नगर उत्तर विभागाचे उपजिल्हाध्यक्ष मेजर कृष्णा सरदार, तालुकाध्यक्ष अनिल लगड, उपाध्यक्ष संग्राम यादव, महेश ढोकचौळे, अमित देशमुख उपस्थित होते. अशा प्रकारे जिथे विषय गंभीर तिथे त्रिदल खंबीर याप्रकारे वाद मिटविण्यात यश आले.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या