संगमनेर शहर : सरकारच्या आश्वासनानंतर छत्रपती संभाजी राजे यांनी मराठा समाजासाठी सुरू केलेले उपोषण मागे घेतले. तथापि, राज्य सरकारला सहजपणे यापूर्वीच मान्य करता येण्यासारख्या मागण्यांसाठी छत्रपतींचे प्राण पणाला लागणे ही महाराष्ट्रासाठी शरमेची बाब आहे.' अशी प्रतिक्रिया देत छावा क्रांतिवीर सेनेचे ग्रामीण जिल्हाध्यक्ष आशिष कानवडे यांनी सरकार वर नाराजी व्यक्त केली.
छावा क्रांतिवीर सेनेचा या उपोषणाला पूर्ण पाठिंबा होता. सरकारने किंवा विरोधी पक्षानेही हे उपोषण टाळण्याचा कोणताही प्रयत्न केला नाही किंवा त्याची ताबडतोब दखलही घेतली नाही. अखेरीस छत्रपतींचे प्राण पणाला लागल्यावर, व मुख्य समन्वयक करण गायकर यांनी आक्रमक पवित्रा घेऊन सरकार ला अल्टीमेंटम दिल्यावर या सरकारला जाग आली आणि त्यांनी काही मागण्या मान्य केल्या.'
'तथापि, बारकाईने विचार केला तर जे काम या सरकारने करायलाच हवे होते आणि जे त्यांना सहजपणे करता आले असते त्यासाठी छत्रपती संभाजीराजे यांना प्राण पणाला लावावे लागले, असे दिसते. मराठा समाजाचे जे हक्काचे आहे व जे सरकारला सहज करता आले असते त्यासाठीही शाहू महाराजांच्या वंशजाला राज्याच्या राजधानीत प्राण पणाला लावावे लागले हा मराठ्यांचा,बहुजनांचा अपमान आहे.'
'सारथी संस्था, अण्णासाहेब पाटील महामंडळाच्या माध्यमातून मराठा तरुण तरुणींना व्यवसायासाठी सवलतीचे कर्ज, मराठा समाजातील विद्यार्थ्यांसाठी वसतीगृहे या मराठा समाजाच्या शिक्षण व रोजगारासाठी केंद्र उभारणे, मराठा आरक्षण, आंदोलकवरील गुन्हे मागे घेणे, छत्रपती संभाजी राजे यांनी वारंवार आवाज उठवला व अखेरीस उपोषण केले. 'सरकार ने मागण्या मान्य केल्याचे सांगितले आहे, त्याचे आम्ही स्वागत करतो पण ते मराठा समाजासाठी किमान एवढे तरी करतील आणि समाजाची तसेच छत्रपतींची फसवणूक करणार नाहीत, अशी आपल्याला आशा आहे. मराठे युद्धात जिंकले आणि तहात हारले असे होऊ नये.'
सरकारने शब्द न पाळल्याने उपोषण सुरू करण्याशिवाय पर्यायच उरला नाही- संभाजीराजे
'सहज पूर्ण करता येण्यासारख्या मागण्यांसाठी राजर्षी शाहू महाराजांच्या वंशजाला प्राण पणाला लावावे लागतात आणि त्यांच्या डोळ्यात पाणी येते तर मराठा आरक्षणासारख्या मुख्य मागण्यांसाठी किती लढावे लागेल, हा संदेश देऊ पाहत की काय? येणाऱ्या काळात छावा क्रांतिवीर सेना, मराठा क्रांती मोर्चा मुख्य समन्वयक तसेच छावा क्रांतिवीर सेना संस्थापक अध्यक्ष करणभाऊ गायकर यांच्या मार्गदर्शनाखाली आक्रमक होऊन जिल्ह्यात काम करेल अशी माहिती छावा क्रांतिवीर सेनेचे ग्रामीण जिल्हाध्यक्ष आशिष कानवडे यांनी व्यक्त केली आहे. यावेळी जिल्हाध्यक्ष रोहित यादव, संगमनेर तालुकाध्यक्ष गणेश थोरात, तालुका उपाध्यक्ष सचिन गांजवे, शेतकरी आघाडीचे जिल्हाध्यक्ष रवींद्र डुबे आदी पदाधिकारी उपस्थित होते.
0 टिप्पण्या