श्रीरामपूर/ बाबासाहेब चेडे - श्रीरामपूर, राहाता, नेवासा, कोपरगाव, संगमनेर, अकोले व राहुरी तालुक्यातील सर्व ईपीएस पेन्शन धारकांचा मेळावा राष्ट्रीय संघर्ष समिती व पॆन्शनर्स वेलफेअर असो. वतीने रविवार दि.६ मार्च २०२२ रोजी दु. १:०० वा. काॅग्रेस भवन, श्रीरामपूर येथे आयोजित करण्यात आला आहे. यावेळी संघटनेचे पदाधिकारी उपस्थित राहून मार्गदर्शन करणार आहेत.
या मेळाव्यात सध्या चालू असलेल्या घडामोडींची माहिती घेणे, पुढील आंदोलनाची रूपरेषा ठरविणे आदि विषयांवर चर्चा होणार आहे. तरी या मेळाव्यास जास्तीत जास्त पेन्शन धारकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे असे आवाहन जिल्हा अध्यक्ष संपतराव समिंदर, श्रीरामपूर अध्यक्ष राधाकृष्ण धुमाळ, संगमनेर अध्यक्ष अशोक देशमुख, राहाता अध्यक्ष सुकदेव आहेर, नेवासा अध्यक्ष बापुराव बहिरट, राहुरी अध्यक्ष ज्ञानदेव डौले आदिनी केले आहे.
0 टिप्पण्या