राहुरी विद्यापीठ : महात्मा फुले कृषि विद्यापीठ, राहुरीचा 54 वा स्थापना दिवस मंगळवार दि. 29 मार्च, 2022 रोजी असून या निमित्ताने विद्यापीठात कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणुन नवी दिल्ली येथील कृषि शास्त्रज्ञ निवड मंडळाचे माजी अध्यक्ष डॉ. सी.डी. मायी हे उपस्थित राहणार आहेत.
यावेळी कृषि शिक्षण, संशोधन, विस्तार शिक्षण आणि प्रक्षेत्र व्यवस्थापन संदर्भात उत्कृष्ट काम करणार्या शास्त्रज्ञांना पुरस्कार प्रदान करुन त्यांना गौरविण्यात येणार आहे. तसेच उत्कृष्ट संशोधन केंद्राला यावेळी पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहेत. कार्यक्रमाला महाराष्ट्रातील चारही कृषि विद्यापीठातील कुलगुरु तसेच माजी कुलगुरु यांच्यासह अधिकारी, शास्त्रज्ञ, कर्मचारी आणि विद्यार्थी उपस्थित राहणार आहेत.
0 टिप्पण्या