कॉलेज कट्टा: भाग 27

परीक्षा विना कट्ट्या मधील हा पुढचा भाग. शिक्षण घेत असताना परीक्षाच नको, असे कसे चालेल; आणि म्हणूनच, याला पर्याय शोधण्यासाठी खरं तर आजचा हा पर्यायी कट्टा

एखादी गोष्ट, लक्षात राहिली की नाही? हे आपण तपासतो तेच मुळात परीक्षा घेऊन. परीक्षा घेण्याच्या आपल्या दोन पद्धती आहेत. एक म्हणजे सातत्याने घेतल्या जाणाऱ्या परीक्षा, आणि दुसर्‍या म्हणजे सहामाही किंवा वार्षिक परीक्षा. सातत्याने परीक्षा घेणे याचा अर्थ कंटीन्यूअस असेसमेंट. यावर आपण यापूर्वी काही प्रमाणात चर्चा केली आहे.

एक पर्याय आहे आणि तो म्हणजे संशोधनाधिष्टीत शिक्षण पद्धती प्रश्न आहे म्हणजे नक्की काय?
अध्ययन केलेले ( शिकवलेले) विद्यार्थ्यांच्या लक्षात ठेवणारी पद्धती कोणती त्याचा आज सांगोपांग असा विचार करूयात...
मग परिक्षा का घ्यायची? तर विद्यार्थ्यांच्या आकलना मध्ये ती गोष्ट किती गेली? हे तपासण्यासाठी! एखादी गोष्ट विद्यार्थ्याला शिकवण्याच्या आपल्याकडे अनेक पद्धती आहेत.
 जसे, 
 विद्यार्थी वाचन करतो !
 शिकवलेल्या गोष्टी ऐकतो!
 एखादा व्हिडिओ पाहतो,
 एखाद्याचे डेमॉन्स्ट्रेशन पाहतो,
 तो आपापसात चर्चा करतो,
 एखादी कृती करतो,
 किंवा विद्यार्थी एकमेकांना शिकवतात...
पण पुन्हा प्रश्न निर्माण होतोच की एखादी गोष्ट आठवणे म्हणजे शिकणं का? ब्लूम नावाच्या एका शास्त्रज्ञांने या बाबतीत सखोल अभ्यास केला आणि bloom's taxonomy ही नवीन ब्रांच उदयास आली. त्यांनी एकच विश्लेषण दोन प्रकारे केले एक म्हणजे कनिष्ठ दर्जाची विचार करण्याची क्षमता आणि दुसरी म्हणजे उच्चदर्जाची विचार करण्याची क्षमता

कनिष्ठ दर्जा मध्ये फक्त आठवणी आणि आत्मसात करणे या दोन गोष्टी त्यांने गृहीत धरले आहेत. तर उच्च विचारसरणी मध्ये जी गोष्ट शिकलेली आहे तिचा वापर करणे, ती गोष्ट अंमलात आणणे, त्याची प्रत्यक्ष अंमलबजावणी करणे, किंवा त्यातून काही तरी सृजनता वा नवनिर्मिती होणे याला तो उच्च दर्जाची विचार करण्याची क्षमता म्हणतो.

शेवटी काय शिक्षण होणं महत्त्वाचं. या प्रत्येक टप्प्यांमध्ये ईव्हॅल्युएशन अर्थात विद्यार्थ्यांची परीक्षा घेणे शक्य आहे... विद्यार्थ्यांनी जो विषय शिकायचा आहे! तो आधी समजावून घ्यायचा! प्रश्न विचारायचा? त्यासाठी नानाविध प्रयोग करायचे! हे सर्व शाखांसाठी सहज शक्य आहे... हे प्रयोग केल्यानंतर अस्तित्वात असलेल्या उत्तराशी साधर्म्य शोधायचं... नसेल तर पुन्हा प्रश्न विचारायचा ?
काय चुकले? अशा प्रकारे हे चक्र पुढे पुढे जात राहील...
       यातून स्वयम् अध्ययनातून विद्यार्थी खूप सारं शिकेल... अशी या मागची मूळ कल्पना. त्याला इंक्वायरी बेस्ट लर्निंग म्हणजेच प्रश्न तयार करून उत्तर मिळवणे अशा पद्धतीची ही शिक्षण पद्धती आहे. ही मुळात एक नवीन अध्ययन पद्धती असून यामध्ये विद्यार्थी सहज प्रत्येक गोष्टीतून शिकत राहतो. त्याची उत्सुकता ताणली जाते, त्याला नवीन शिकण्याची आस निर्माण होते, त्याला शिकण्यासाठी चा ध्यास असतो, त्याचे पुन्हा काही टप्पे पडतात... पहिला टप्पा जे शिकतोय ते विद्यार्थ्याच्या जगण्याशी संबंधित असायला हवं... 

हळदीघाटची लढाई शिकवू किंवा पानिपतचे युद्ध किंवा 1857 चा उठाव किंवा छत्रपती शिवाजी महाराजांची एखादी लढाई ती माझ्या जीवनाशी संबंधित कशी आणता येईल... असा विचार करायला लागणं म्हणजे context बेस्ड लर्निंग... संदर्भा सह स्पष्टीकरण का शिकायचं...

 हे कसं शिकायचं? शिकण्यासाठी काय काय लागतं? हा पुढचा टप्पा त्यामध्ये प्रयोगासाठी साहित्य लागेल विज्ञानातील असेल किंवा कला शाखेतील असेल या साहित्याची एकदा मैत्री झाली की शिकण्यातली गोडी निर्माण होईल... आणि विद्यार्थी आपसूक शिकू लागेल... पुढचा टप्पा प्रश्न निर्माण करणे ? मला काय शिकायचे आहे? यासाठी चे प्रश्न विद्यार्थ्याला निर्माण करता आले पाहिजेत ? एकदा प्रश्न निर्माण करुन झाले विद्यार्थीच प्रश्न कर्ते निर्माण झाले की, उत्तर देणे सोपे होईल. म्हणून प्रश्न करते व्हा ? खूप प्रश्न विचारा ! यातल्या काही प्रश्नांची उकल लगेच होणार नाही, पण जशी होईल तसं तसं शास्त्र किंवा त्यामागची कारणमीमांसा समजायला सुरुवात होईल ... आणि सगळ्यात शेवटी हे सगळं झाल्यावर हे मांडायचं कसं मांडण्याचा अनेक पद्धती असू शकतात त्याला आउटपुट असे म्हणतात आणि म्हणून ही सगळी शिक्षण पद्धती ही आउटकम बेस्ट लर्निंग यावर आधारित आहे. चला तर आपण काहीतरी आउटपुट मिळेल या ध्यासाने, या न्यायाने शिक्षण देत घेत राहूया.
शिकायला भाग पाडू या... शिकवू या... आनंदाने शिकवू देऊया...
ज्ञानसूत डॉ. संजय चाकणे
प्राचार्य: कला, विज्ञान आणि वाणिज्य महाविद्यालय इंदापूर.
सदस्य: अभ्यासमंडळ, अधिसभा, विद्यापरिषद, परीक्षा विभाग, व्यवस्थापन परिषद सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ, पुणे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या