श्रीरामपूर ( बाबासाहेब चेडे ) : ईपीएस -95 पेन्शन धारकांच्या पेन्शन वाढी बाबत 24 मार्च पासून सात एप्रिल पर्यंत संपूर्ण देशभर पेन्शनर बचाव आंदोलन करण्यात येणार असल्याचा निर्णय नुकत्याच झालेल्या कार्यकारिणीच्या बैठकीत घेण्यात आला.
7 मार्च ते 11 मार्च पर्यंत सर्व भविष्य निर्वाह निधी कार्यालयावर त्याचप्रमाणे गोवा गोवाहती येथे झालेल्या सीबीटी मीटिंग समोर पेन्शन धारकांनी आंदोलन केले व समक्ष सीबीटी अध्यक्ष व सदस्यांना निवेदन दिले. हे आंदोलन राष्ट्रीय संघर्ष समितीचे राष्ट्रीय अध्यक्ष कमांडर अशोक राऊत यांच्या मार्गदर्शनाखाली होत आहे. सात एप्रिल पासून सुरु होणाऱ्या आंदोलनात प्रभावशाली पद्धतीने लढा दिला जाणार आहे. सीबीटी अध्यक्ष व सर्व सदस्य यांना समक्ष भेटून निवेदन व आंदोलनाची नोटीस देण्यात येणार आहे याची जबाबदारी दिल्ली, कलकत्ताा, हैदराबाद व जळगाव येथील संबंधित प्रांतीय अध्यक्ष व मुख्य समन्वयक यांचेकडे दिली आहे.
त्याचप्रमाणे आपापल्या मतदारसंघातील खासदारांना समक्ष निवेदन देऊन याच अधिवेशनात हा प्रश्न उपस्थित करण्याचे विनंती करावी तसेच खासदार यांचे घरासमोर सत्याग्रह क्रमिक आमरण उपोषणाची नोटीस द्यावी हे शक्यतो 26 व 27 मार्च रोजी केले जाणार आहे. दि 27 मार्च रोजी खा. डॉ सुजय विखे पा. व खा सदाशिव लोखंडे आदींची भेट जिल्ह्यातील पदाधिकारी घेणार आहे. दिल्ली येथे विशाल आंदोलन प्रस्तावित असलेने त्याचे आयोजन करावे त्याचा निर्णय शिर्डी येथे आगामी होणाऱ्या कार्यकारिणी बैठकीत घेतला जाणार आहे. प्रस्थापित विभागीय मेळावे उत्तराखंड, बंगलोर अथवा मैसूर, कलकत्ता, भिलाई, आमदाबाद या ठिकाणी घेण्यात येणार आहे.
राष्ट्रीय संघर्ष समितीची सातवी कार्यकारिणी बैठक येत्या 17 व राष्ट्रीय पेन्शनर्स अधिवेशन 18 एप्रिल रोजी शिर्डी येथे घेण्यात येणार असल्याची माहिती पश्चिम भारत संघटक सुभाष पोखरकर यांनी श्रीरामपूर येथे दिली. पंतप्रधानांना पोस्टकार्ड पाठवण्यात ची कार्यवाही तसेच पुढे चालू राहील व मुख्यमंत्री राज्यपाल व अन्य पदाधिकारी यांना यासंदर्भात निवेदन देण्यात यावी, असे आवाहन करण्यात आले आहे.
0 टिप्पण्या