ढोरकीन येथील जिल्हा परिषद शाळेतील विद्यार्थ्यांनी घेतली ऑटोमाबाईल क्षेत्रातील माहीती


शिक्षक पाराशर बोर्डे यांचा उपक्रम

 पैठण : पैठण तालुक्यातील ढोरकीन येथील जिल्हा परिषद प्रशाला हायस्कूल शाळेतील दहावीत शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांनी बिडकीन येथील वैद्य ऑटो या व्यवसाय संस्थेला नुकतीच भेट दिली. विद्यार्थ्यांमध्ये व्यावसायिक दृष्टिकोन वाढवा या उद्देशाने समग्र शिक्षा अभियानांतर्गत, व्यवसाय शिक्षण विभागातर्फे या क्षेत्रभेटीचे सहशिक्षक पराशर बोर्डे यांनी नियोजन केले होते. विकास वैद्य व सचिन वैद्य यांनी विद्यार्थ्यांना महत्वपूर्ण मार्गदर्शन केले. 

    वैद्य यांनी विद्यार्थ्यांना दहावीनंतर ऑटोमोबाईल क्षेत्रात असलेल्या करिअरच्या विविध संधी आणि अभ्यासक्रम याबद्दल सविस्तर माहिती दिली. दरम्यान चारचाकी वाहनाच्या सर्व्हीसची कामे व ऑईल लेवल चेक करणे, एअर फिल्टर बदलणे, पेट्रोल आणि डिझेल इंजिनचे कार्य, बी. एस. ६ प्रमाणे वाहणामध्ये झालेले आधुनिक बदल तसेच ऑटोमेटीक टायर बदलणे व व्हील बॅलंसिंग, व्हील अलायनमेन्ट करण्याची प्रक्रिया विद्यार्थ्यांना प्रात्याक्षिकाद्वारे समजवून देण्यात आली, तसेच फायदे कार्य, वर्कशॉपमध्ये काम करताना कोणती काळजी घ्यावी याबद्दलही सविस्तर माहिती देण्यात आली. प्रशालेच्या मुख्याध्यापिका श्रीमती एस. एम. रत्नपारखे यांच्या मार्गदर्शनाखाली व शालेय समिती अध्यक्ष राजेंद्र मूळे यांनी उपक्रमाच्या यशस्वीतेसाठी सहकार्य केले. तर क्षेत्रभेटीचे नियोजन ऑटोमोबाईल व्यवसाय प्रशिक्षक पराशर बोर्डे यांनी केले. यावेळी शाळेतील सर्व शिक्षकवृंदांचे सहकार्य लाभले.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या