राहुरी शहर/ अशोक मंडलिक : दि. २२ फेब्रुवारी २०२२ रोजी राहुरी येथील मोक्का तील आरोपी पलायन प्रकरणी जबाब देणे कामी पो. अधीक्षक कार्यालय येथे सरकारी साक्षीदार विजय मकासरे आले असता सदर प्रकरणामुळे निलंबित करण्यात आलेले पी.एस.आय. तुषार धाकराव यांनी मकासरे यांच्या गळ्यात हात टाकून बाजूला घेत " माझ्या बाजूने जबाब दे, नाहीतर तुला खोट्या गुन्ह्यात अडकवेल " असे म्हणून दमबाजी केली आहे, अशी तक्रार साक्षीदार मकासरे यांनी अहमदनगर चे पोलीस अधीक्षक यांच्याकडे केली आहे.
सदर अर्जात मकासरे यांनी या घटनेमुळे आपल्या जीवितास धोका निर्माण झाला आहे, असे म्हंटले आहे. तसेच निलंबन झाल्यामुळे या पोलिसांची मुजोरी अजूनच वाढली आहे. या घटेनेनंतर लगेच विजय मकासरे यांनी पोलिस अधिक्षक यांना सदर घटने संदर्भात लेखी तक्रार करत माहिती दिली आहे. सदर ची घटना ही सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली असून पोलिस अधीक्षक निलंबित पोलिस अधिकारी तुषार धाकराव यांच्या विरुद्ध कारवाईचे आदेश करतील ? या कडे सर्व जिल्ह्याचे लक्ष लागले आहे.
0 टिप्पण्या