जायकवाडी/बबलु जाधव : पैठण एमआयडी परीसरातील हनुमाननगर येथील मोरया स्टेडियमवर मार्केट कमिटीचे संचालक भाऊ पाटील लबडे यांच्या वाढदिवसानिमित्त भव्य खुल्या टेनिस बाॅल क्रिकेट स्पर्धेचे आयोजन करण्यात आले असून या स्पर्धेचे उद्घाटन माजी अर्थ व बांधकाम सभापती विलास भुमरे यांच्या हस्ते शुक्रवारी (दि.२५) करण्यात आले.
मोरया प्रतिष्ठाण मुधलवाडी यांच्या वतीने आयोजित स्पर्धेत प्रथम पारितोषिक २१ हजार रुपये गणेश रोडे यांच्या वतिने तर द्वितिय पारितोषिक ११ हजार रुपये माजी सरपंच शिवाजी जाधव व सरपंच संजय गवळी यांच्या वतीने तर तृतीय पारितोषिक ७ हजार रुपये कुमार काळे व संदीप नवले यांच्या वतीने दिले जाणार असुन या व्यतिरीक्त इतर वैयक्तिक बक्षिसांची रेलचेल झाल्यामुळे दुरदुरुन मोठ्या संख्येने क्रिकेट खेळाडूंनी या ठिकाणी आपला सहभाग नोंदवीने चालु आहे.
यावेळी तालुका प्रमुख आण्णाभाऊ लबडे, शिवाजी जाधव, ख.वि.सं.संचालक अंकुश बोबडे, मुनाफ शेख, संजय गवळी, विलास दहिहांडे, भुषण कावसानकर, नईम शेख, अमित शिंदे, दादासाहेब गलांडे, योगेश रोडे, शिवराज मित्र परीवार, पांडुरंग लबडे, सतीश लबडे, स्वप्निल चालक, सुनिल गहाळ, कृष्णा लबडे, अर्जुन जाधव, गजानन थोटे, हेमंत खंडागळे, शाम शेलार, सुरज तंगडे, अण्णा मोरे, लहु सातपुते, जुबेर शेख, शाकिर सय्यद,ज्ञकुनाल हिवराळे, शाकिर शेख, पिनु कातकडे, योगेश पवार, उद्धव आढाव, करण बोडखे, बंटी सातपुते, गणेश नवले, गणेश जर्हाड, सुनिल पाटील, नंदु आढाव, दिपक जाधव, बंटी गणेश बोडखे आदींची उपस्थिती होती.
0 टिप्पण्या