अहमदनगर/ जावेद शेख : राहाता तालुक्यातील कोल्हार भगवतीपूर येथील इदगाह मैदानावर रविवार दिनांक २७ फेब्रुवारी २०२२ रोजी सकाळी ९:३० वाजता, तरक्की ए उर्दु आवामी तहेरीक च्या विद्यमाने व कोल्हार एज्युकेशन अँड सोशल वेल्फेअर सोसायटी संचलित डॉ.ए.पी.जे. अब्दुल कलाम उर्दु लायब्रेरी अँड स्टडी सेंटरचे उद्घाटन शूभहस्ते मा. डॉ.कासिम इमाम मुंबई (इंटर नॅशनल शायर), अस्लम परवेज (सुप्रसिध्द लेखक), के. सी. खुराना (इंटर नॅशनल शायर, दिल्ली ), फारूख सय्यद (संपादक मासिक गुलबूटे) यांच्या प्रमुख उपस्थितीत व श्री.दंडवते (विश्वस्त साई संस्थान), दिलीपराव वाकचौरे (हॉटेल के. बी.एस.ग्रँड), ॲड.सुरेंद्रराव पा. खर्डे (मा.सरपंच कोल्हार ग्रा.पं.), शकीलभाई शेख (सामाजिक कार्यकर्ते), सलीमखान पठाण (चेअरमन प्राथ. शिक्षक बँक), भाऊसाहेब खर्डे पा. (उपाध्यक्ष भगवतीमाता देवालय ट्रस्ट) यांच्या उपस्थितीत होणार असल्याची माहिती आयोजक पत्रकार राजमोहंमद शेख यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे दिली आहे.
कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी असीरभाई पठाण, असीफभाई मुंबईवाले, ईदरिसभाई संगमनेर, अब्दुल्लाभाई चौधरी संगमनेर, पत्रकार सलीमभाई शेख, डॉ.जी.पी.शेख संगमनेर, नासीरभाई शेख, मोहसिनभाई शेख, बबलुभाई शेख, निसारभाई शेख, मुन्नाभाई शेख, नसरिन बाजी (मुख्याध्यापक जि.प.उर्दु कोल्हार), अतीक सर (मुख्याध्यापक न्यू चांद सुल्ताना उर्दु हायस्कूल), समस्त ग्रामस्थ कोल्हार भगवतीपूर, परिश्रम घेत असल्याचेही प्रसिद्ध पत्रकात म्हटले आहे.
0 टिप्पण्या