कृषी शिक्षण घेत असलेल्या विद्यार्थ्यांनी संशोधन करून माझ्यापेक्ष्याही उंच भरारी घ्यावी- बिजमाता पद्मश्री राहिबाई पोपेरे

लोणी - विद्यार्थ्यांना शेतकरी व शेतीशी निगडित असलेल्या व्यक्तींच्या प्रेरणादायी यशोगाथा अनुभवता याव्यात यासाठी लोकनेते पद्मभूषण डॉ. बाळासाहेब विखे पाटील प्रवरा ग्रामीण शिक्षण संस्थेचे अध्यक्ष आ. राधाकृष्ण विखे पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली शेती सहलींचे आयोजन करण्यात येत असून त्याच अनुषंगाने संस्थेच्या कृषी जैवतंत्रज्ञान महाविद्यालय, लोणी येथील अंतिम वर्षातील विद्यार्थीची अहमदनगर जिल्ह्यातील कोंभाळणे गावच्या ‘बीजमाता’ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या पद्मश्री सौ. राहीबाई पोपरे यांच्या पारंपरिक बियाणे बँक येथे शैक्षणिक सहलीचे आयोजन केल्याची माहिती महाविद्यालयाचे प्राचार्य ऋषिकेश औताडे यांनी दिली.

सध्याच्या काळात अन्नधान्यातील सदोषतेमुळे मानवाला अनेक रोगांना तोंड द्यावे लागत आहे. यातून मुक्तता मिळविण्यासाठी अन्नधान्य बियाणांचे पारंपारिक वान विकसित करून विषमुक्त शेतीला चालना मिळावी यासाठी माझे प्रयत्न सुरु आहेत. कृषी शिक्षण घेत असलेल्या विद्यार्थ्यंनी अजून संशोधन करून माझ्यापेक्ष्याही उंच भरारी घेऊन अशे नवीन नवीन रोग मुक्त वाणाची निर्मिती करावी असे आवाहन देशातील पहिली सिड बँक उभारणाऱ्या बिजमाता पद्मश्री राहिबाई पोपेरे यांनी केले.

यासहली दरम्यान विद्यार्थ्यांना राहिबाई पोपरे यांच्या बियाणे बँकेत अधिवासी परंपरेने जपलेल्या ५३ पिकांच्या ११४ गावरान वाणाबद्दल माहिती तसेच व पारंपारिक गावरान बियाणांची उत्पत्ती आणि सावधानतेबाबत विशेष मार्गदर्शन मिळाले. शैक्षणिक सहल आयोजनासाठी महाविद्यालयाचे प्रा.भाऊसाहेब घोरपडे, प्रा.अमित अडसूळ, प्रा. स्वरांजली गाढे यांनी विशेष परिश्रम घेतले.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या