शिवाजी महाराजांचा प्रत्येक विचार आत्मसात करण्याची गरज - सहयोगी अधिष्ठाता डॉ. मिलिंद अहिरे

हळगाव कृषी महाविद्यालयात शिवजयंती उत्साहात साजरी

राहुरी : भारतीय आरमाराचे पहिले जनक हे छत्रपती शिवाजी महाराज होते. शिवाजी महाराज असते तर ब्रिटिश आपल्या वरती राज्य करू शकले नसते. महाराजांनी जिंकलेल्या सर्व किल्ल्यांचे संवर्धन केले पाहिजे. शिवाजी महाराजांचा एक जरी विचार आपल्या पिढीने आत्मसात केला तर आपली पिढी फार पुढे प्रगती करू शकते. जेव्हा लढाई ची वेळ होती तेव्हा महाराजांनी स्त्रियांना हानी होऊ दिली नाही व सदैव स्त्रियांचा आदर करत होते असे प्रतिपादन हळगाव कृषी महाविद्यालयाचे सहयोगी अधिष्ठाता डॉ. मिलिंद अहिरे यांनी केले.

भारतीय स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवी वर्षानिमित्त महात्मा फुले कृषी विद्यापीठ राहुरी येथील पुण्यश्लोक आहिल्यादेवी होळकर कृषी महाविद्यालय हळगाव येथे राष्ट्रीय सेवा योजना मार्फत छत्रपती शिवाजी महाराज जयंती ऑनलाइन पद्धतीने साजरी करण्यात आली त्यावेळी डॉ. अहिरे अध्यक्षस्थानावरून बोलत होते. कार्यक्रमाच्या सुरूवातीला छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमेचे पूजन महाविद्यालयाचे सहयोगी अधिष्ठाता डॉ. मिलिंद अहिरे व इतर शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी तसेच आठव्या सत्रातील उपस्थित विद्यार्थ्यांच्या हस्ते करण्यात आले. कार्यक्रमाचे स्वागत कृषी महाविद्यालया च्या राष्ट्रीय सेवा योजने ची स्वयंसेविका कु. आश्लेषा डमारे तर सूत्रसंचालन महेश जाधव यांनी केले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक कार्यक्रम अधिकारी प्रा. किर्ती भांगरे यांनी केले तर कु. प्रजाली गोसावी, कु. मंजिरी पाटील, कु. अक्षय गुंजाळ यांनी आपले मनोगत व्यक्त केले तर आभार स्वयंसेवक रोहित लोहकरे यांनी केले.

यावेळी कृषी महाविद्यालयाचे डॉ. प्रेरणा भोसले, डॉ. मनोज गुड, सर्व शिक्षकेतर कर्मचारी तसेच कृषी महाविद्यालयाचे विद्यार्थी व विद्यार्थिनी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या