पेमगिरीत ना.थोरातांच्या उपस्थितीत पाणलोट विकास कामांचा शुभारंभ

संगमनेर : स्वराज्यसंकल्पभूमी पेमगिरीत आज राज्याचे महसूलमंत्री ना. बाळासाहेब थोरात व जयहिंद लोकचळवळीचे संस्थापक आमदार डॉ. सुधीर तांबे यांच्या हस्ते पंचक्रोशीतील पाणलोट विकास कामांचा शुभारंभ करण्यात आला.

कार्यक्रमाच्या सुरुवातीला दंडकारण्य अभियानाचे प्रणेते स्वातंत्र्यसेनानी स्व.भाऊसाहेब थोरात व वनराईचे संस्थापक माजी केंदीय मंत्री पद्मविभूषण स्व.मोहन धारिया यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करुन अभिवादन करण्यात आले. क्रॉम्प्टन मुंबई, वनराई संस्था पुणे तसेच जयहिंद लोकचळवळ यांच्या सहकार्याने जलसंधारणाची कामे सुरु करण्यात येणार आहेत. पाण्याचा प्रत्येक थेंब ना थेंब अडवून जमिनीत जिरविने तसेच ज्या- ज्या ठिकाणी शक्य आहे त्या ठिकाणी कामे सुरु करा त्यासाठी आम्ही सर्वतोपरी सहकार्य करू अशी ग्वाही ना.थोरातांनी आपलं मनोगत व्यक्त करताना दिली. तसेच जलसंधारणाविषयी हिवरेबाजार गावचा दाखलाही त्यांनी यावेळी दिला.

या कार्यक्रम प्रसंगी वनराईचे अध्यक्ष रवींद्र धारिया, जिल्हा बँकेचे व्हाईस चेअरमन माधवराव कानवडे, तहसीलदार अमोल निकम, मिलिंद कानवडे, आर एम कातोरे, रमेश गुंजाळ, पांडुरंग घुले, विलास कवडे, निखिल पापडेजा, मारुती कवडे, सुहास आहेर, नानासाहेब कानवडे, रावसाहेब डुबे, शांताराम डुबे, सोमनाथ गोडसे, संदीप डुबे, स्वप्नील कोल्हे, मिलिंद टपाल, बाळासाहेब कानवडे, शिवाजी वलवे, संदीप गोपाळे, अर्चना बालोडे, द्वारका डुबे, अर्चना शेळके, अर्चना वनपत्रे तसेच पेमगिरी, नांदुरी दुमाला, मिरझापूर, पिंपळगाव माथा या गावातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या