श्रीरामपूर / बाबासाहेब चेडे : भारत निवडणूक आयोग, जिल्हाधिकारी कार्यालय, निवडणूक शाखा, अहमदनगरच्या वतीने राष्ट्रीय मतदार जागृती स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे, अशी माहिती जिल्हा निवडणूक अधिकारी तथा उपजिल्हाधिकारी मा.जितेंद्र पाटील व अपंग सामाजिक विकास संस्थेचे चेअरमन संजय साळवे यांनी दिली.
स्पर्धेकरिता विषय १) माझे मत माझे भविष्य २) एका मताचे सामर्थ्य स्पर्धा प्रकार...
अ) गीत गायन स्पर्धा
१) संस्थात्मक विभाग : प्रथम बक्षिस १००००० (एक लाख), द्वितीय बक्षिस ५०००० (पन्नास हजार), तृतीय बक्षिस ३०००० (तीस हजार), विशेष पारितोषिक १५००० (पंधरा हजार).
२) व्यावसायिक विभाग : प्रथम क्रमांक ५०००० (पन्नास हजार), द्वितीय क्रमांक ३०००० (तीस हजार), तृतीय क्रमांक २०००० (वीस हजार), विशेष पारितोषिक १००००(दहा हजार).
३) हौशी विभाग : प्रथम क्रमांक २०००० (वीस हजार), द्वितीय क्रमांक १०००० (दहा हजार), तृतीय क्रमांक ७५०० (सात हजार पाचशे) विशेष पारितोषिक ३००० (तीन हजार).
ब) व्हिडिओ मेकिंग स्पर्धा
१) संस्थात्मक विभाग : प्रथम क्रमांक २००००० (दोन लाख), द्वितीय क्रमांक १००००० (एक लाख), तृतीय क्रमांक ७५००० (पंच्चाहत्तर हजार), विशेष पारितोषिक ३०००० (तीस हजार).
२) व्यावसायिक विभाग : प्रथम क्रमांक : ५०००० (पन्नासहजार), द्वितीय क्रमांक : ३०००० (तीस हजार), तृतीय क्रमांक : २०००० (वीस हजार), विशेष पारितोषिक : १००००(दहा हजार),
३) हौशी विभाग : प्रथम क्रमांक : ३०००० (तीस हजार), द्वितीय क्रमांक : २०००० (वीस हजार), तृतीय क्रमांक : १०००० (दहा हजार), विशेष पारितोषिक : ५०००.
भित्तीचित्र (पोष्टर स्पर्धा)
१) संस्थात्मक विभाग : प्रथम क्रमांक : ५०००० (पन्नास हजार), द्वितीय क्रमांक : ३०००० (तीस हजार), तृतीय क्रमांक : २०००० (वीस हजार), विशेष पारितोषिक : १०००० (दहा हजार),
२) व्यावसायिक विभाग : प्रथम क्रमांक : ३०००० (तीस हजार, द्वितीय क्रमांक : २०००० (वीस हजार), तृतीय क्रमांक : १०००० (दहा हजार), विशेष पारितोषिक : ५००० (पाच हजार),
३) हौशी विभाग : प्रथम क्रमांक : २०००० (वीस हजार), द्वितीय क्रमांक : १०००० (दहा हजार), तृतीय क्रमांक : ७५०० (सात हजार पाचशे), विशेष पारितोषिक : ३००० (तीन हजार),
घोषवाक्य स्पर्धा : प्रथम क्रमांक : २०००० (वीस हजार), द्वितीय क्रमांक : १००००(दहा हजार), तृतीय क्रमांक : ७५०० (सात हजार पाचशे), विशेष पारितोषिक :२००० (दोन हजार).
स्पर्धेत सहभागी होण्याकरिता क्यूआर कोड स्कॅन करून सहभाग नोंदवायचा आहे. सहभागी ई प्रमाणपत्र लगेच ऑनलाईन प्राप्त होईल. अधिक माहितीसाठी व नांव नोंदणी करिता वर्षा गायकवाड सचिव अपंग सामाजिक विकास संस्था, सहर्षा हाॅल, दिव्यांग पूनर्वसन केंद्र, बोंबले पाटील नगर, रासकर नगर जवळ, समोर, श्रीरामपूर मो.९८२२४७१०८९ व ८०१०९२७८९१ यांठिकाणी संपर्क साधावा असे आवाहन प्रशासनाच्या वतीने करण्यात आले आहे.
0 टिप्पण्या