राहुरी शहर/ अशोक मंडलिक : २७ फेब्रुवारी कुसुमाग्रज यांची जयंतीनिमित्त हा दिवस मराठी भाषा दिवस म्हणून साजरा करतो. या दिवसाचे औचित्य साधून राज ठाकरे यांच्या आदेशाने आज मराठी राजभाषा गौरवदिना निमित्त महाराष्ट्र नवनिर्माण सेना राहुरी फॅक्टरी या शाखेच्या वतीने " मी मराठी माझी स्वाक्षरी मराठी " ही मराठी स्वाक्षरी मोहीम आयोजित करण्यात आली होती.
व्हिडिओ पहा- मनसेकडुन मराठी राजभाषा गौरवदिनानिमित्त मराठीत स्वाक्षरी मोहीम...
मोहिमेचे उद्घाटन प्रसंगी मारुतीमामा खरात, मनसे तालुकाध्यक्ष अनिलभैय्या डोळस, तालुका सचिव अनिल गिते, प्रमोद विधाते, मनविसे शहराध्यक्ष संदेश पाटोळे, उपशहाराध्यक्ष साहिल पठाण, शुभम गीते, सचिन सोनवणे, ऋषी पोटे, यश सरोदे, वरूण शिंदे, पिनू कोबरणे, सौरभ कल्हापुरे, हर्षद ताथेड, तुकाराम मोरे, श्रीकांत पाटोळे, पृथ्वीराज चव्हाण, रामा कोबरणे, सिद्धार्थ चव्हाण, निखिल सांगळे आदींसह असंख्य मराठी प्रेमी व मनसैनिक उपस्थित होते.
0 टिप्पण्या