विज्ञान दिन...

सर सी व्ही रामन यांच्या रामन effect च्या शोधाचा दिवस. आकाश निळे का दिसते ? हा प्रश्न या शोधाचे उगम स्थान.

आपल्याकडे नोबल प्राईजेस मिळत का नाहीत? भारतीय उपखंडात पेटंट मिळण्याचे प्रमाण इतर देशांच्या मानाने फार कमी आहे. मूलभूत विज्ञानावर कमी काम केले जाते. किंवा अप्लाइड रिसर्च सुद्धा फार कमी असतो. अशी ओरड करणाऱ्यांची संख्या खूप जास्त आहे. जी अत्यंत रास्त आहे. पण लक्षात कोण घेतो? याला कुठेतरी आपली शिक्षण पद्धती जबाबदार आहे ?असा विचार आपण का करत नाही? हा मोठा प्रश्न पडावा. मुळात विज्ञान हे विज्ञान शाखा अंतर्गतच असले पाहिजे असे नव्हे. नव्या शैक्षणिक धोरणात याचा खूप सुरेख संगम साधला आहे, असे वाटते. मुळात शिक्षणाचे भारतीयीकरण अत्यंत मोठ्या प्रमाणात झाले पाहिजे. जाती-पाती विरहित, धर्मनिरपेक्ष वैज्ञानिक दृष्टीकोन तयार झाला पाहिजे. वैज्ञानिक दृष्टिकोन म्हणजे, फक्त पीएचडी साठी किंवा एम फिल साठी केलेले काम नव्हेच. मुळात संशोधनाच्या व्याख्याच आपल्याला बदलाव्या लागतील.

माहिती संकलित करणे, म्हणजे संशोधन नव्हे. माहितीचा उपयोग करणे म्हणजे ज्ञान... आणि ज्ञानाची निर्मिती करणं म्हणजे संशोधन ही ज्ञाननिर्मिती करण्यासाठी आपल्याला खूप प्रयत्न करावे लागतील. लहान मुलांपासून वैज्ञानिक दृष्टिकोन रुजवावा लागेल. हे म्हणणं जेवढं सोपं वाटतं तेवढं ते नसतं, आणि म्हणूनच मुलांची प्रश्न विचारण्याची क्षमता मारून टाकता कामा नयेत. त्यांनी प्रश्न विचारत राहिले पाहिजे. मुळात पाठांतराचे विज्ञान आपल्याला बंद करावे लागेल. त्याऐवजी कुतूहल, उत्सुकता, जाणिवा, जागृती, जिज्ञासा, जपाव्या लागतील.

मुळात मूलभूत संशोधन करताना अमेरिकेची किंवा युरोप राष्ट्रातील लोकांची काय मागणी आहे, हे न पाहता आजूबाजूला कशाची गरज आहे? यावर जास्त संशोधन झाले पाहिजे? म्हणजे खेड्यातल्या महाविद्यालयांमध्ये आसपास शेतीला कशाची गरज आहे? 'यावर संशोधन व्हायला हवे!' ते फक्त कृषी महाविद्यालय यांनीच करणं हे कुठेतरी मारक ठरत आहे, आणि म्हणूनच अंतर शाखीय अंतर वर्गीय अंतर विभागीय आंतर महाविद्यालयीन आंतरविद्यापीठीय अंतर्राज्यीय या संशोधनावर भर द्यावा लागेल. वास्तविक पहिलीपासूनच कृषी विषयक काही धडे आपल्याला शिकवावे लागतील. फ्रेंच राज्यक्रांती शिकवण्या ऐवजी कृषिक्रांती, धवलक्रांती किंवा रोज नव्याने शेतीत होत असलेले प्रयोग आपण जर पाठ्यक्रमात अर्थात अभ्यासक्रमांमध्ये आणले तर इतिहास आपल्याला शिकवावाच लागणार नाही इतिहासातील विज्ञान शिकवलं तर! म्हणजे काय प्रत्येक गोष्टीच विज्ञान आपल्याला सांगता आले पाहिजे. आणि ते वर्गातच गेले पाहिजे असे नाही. वर्गातल्या शिक्षणाबरोबर अभ्यासेतर उपक्रम व अभ्यासपूरक उपक्रम यांची नोंदी ही जास्त ठेवावीच लागेल. प्रात्यक्षिकांवर प्रचंड भर द्यावा लागेल. मुळात आपल्याकडची भौतिक सुविधांची रेलचेल वाढवावी लागेल. ऑनलाइन शिक्षणाचा आपण खेळखंडोबा केला आहे आणि त्यामुळे ते विज्ञानाला जास्त मारक ठरत आहे. या सगळ्यातून बाहेर पडायच असेल तर आपल्याकडे जसा ट्रेण्ड येतो जसा की इंजीनियरिंग म्हटले की सगळी मुलं इंजीनियरिंग कडे जातात, मेडिकल की लगेच तिकडे फार्मसी कडे तर कधी कॉमर्स कडे मध्येच विज्ञानाची टूम येते आणि म्हणूनच असं न घडता याचे तोटे आपण खरे तर सगळ्यांनी अनुभवलेले आहेत. म्हणूनच असं न घडता आपण आंतरशाखीय जास्तीत जास्त प्रकाराने horizontal मोबिलिटी ज्याला म्हणतात ती वाढवली पाहिजे. हे एकट्या-दुकट्या चे काम नव्हे हे सगळ्यांनी मिळून करायला हवे. शिक्षण पद्धतीत बदल करायला हवे. म्हणून आरडाओरडा करणारे लोक नवी शिक्षणपद्धती आली की लगेचच त्यातल्या त्रुटी किंवा चुका दाखवायला समोर येतात परंतु याची अंमलबजावणी नीट कशी होईल याकडे जास्त लक्ष दिले पाहिजे. विज्ञान वाद अर्थात वैज्ञानिक दृष्टीकोन असलेली पिढी तयार झाली पाहिजे. बालवाडी पासून सायंटिफिक appoach विकसीत करण्यासाठी शिक्षक पालक यांच्यातला सकारात्मक बदल घडवून आणावा लागेल. प्रश्नाच्या मुळाशी जाण? मुळात प्रश्न विचारू देणं? Theory पेक्षा practical वर भर देणं कारण मीमांसा करण, कार्यकारण भाव असणं, कमी पडतंय का, European Union जो initiative घेतला तो आपल्याकडे यायला हवा, आपण psudo science अर्थात छदमी विज्ञानाकडे जातोय, विज्ञानाधिष्ठित शिक्षण पद्धतीवर भर दिला पाहिजे.

मातृभाषेतील विज्ञान लेखकांची पुस्तके वाचली पाहिजेत. आपल्याकडे डॉ. सुखात्मे, डॉ क्षीरसागर, डॉ. जयंत नारळीकर, डॉक्टर पंडित विद्यासागर, डॉ. फडके, वी द घाटे, नवनाथ लोंढे, डॉ. संजय ढोले, या व अशा लेखकांनी अनेक वैज्ञानिक पुस्तके लिहिली आहेत ती यानिमित्ताने वाचली पाहिजेत.
   चला वैज्ञानिक होऊ या वैज्ञानिक दृष्टीकोन विकसीत करू या...
विज्ञान दिनाच्या शुभेच्छा ...

ज्ञानसुत संजय चाकणे
प्राचार्य: कला, विज्ञान आणि वाणिज्य महाविद्यालय इंदापूर.
सदस्य: अभ्यासमंडळ, अधिसभा, विद्यापरिषद, परीक्षा विभाग, व्यवस्थापन परिषद सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ, पुणे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या