श्रीरामपूर [ बाबासाहेब चेडे ] : इपीएस ९५ पेन्शन धारकांच्या प्रश्नासंदर्भात केंद्रीय वित्त सचिव डॉ टी वी सोमनाथन व सहकारी तसेच सेन्ट्रल प्रोव्हीडेट फंड कमिशनर श्रीमती नीलम शमी राव यांच्या समवेत दि ८ फेब्रु रोजी नवी दिल्ली येथे राष्ट्रीय संघर्ष समितीची बैठक मथुरा संसद खा.हेमामालिनी यांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रीय अध्यक्ष कमांडर अशोकराव राउत समवेत बैठक होऊन सकारात्मक चर्चा झाली व वित्त सचिव व सेन्ट्रल प्रो फंड कमिशनर यांनी लवकर पेन्शन धारकांना पेन्शन वाढीचा योग्य न्याय देण्याचे आश्वासन दिले.
शिष्टमंडळात कमांडर अशोक राउत समवेत राष्ट्रीय महासचिव वीरेंद्रसिंह राजावत, कवीश डांगे, राष्ट्रीय मुख्य सल्लागार आशाराम शर्मा, दक्षिण भारत मुख्य समन्वयक रमाकांत नरगुंड यांनी प्रतिनिधित्व केले. यावेळी पेन्शन वाढीसंदर्भात सविस्तर चर्चा झाली व इपीएफओ कडे उपलब्ध पेन्शन फंडामध्ये जमा असलेल्या अंशदान व व्याज मधूनच मिनिमम पेन्शन रु ७५००/- अधिक महागाई भत्ता देऊन पेन्शन वाढ करता येऊ शकते व त्या बरोबर कॉर्पस पण वाढणार आहे. त्यासाठी आवश्यक कागदपत्रे सादर केली. इंजि. विधिज्ञ कवीश डांगे यांच्या अध्यक्षतेखाली राष्ट्रीय संघर्ष समिती गठीत डांगे समिती रिपोर्ट केंद्रीय अर्थ समितीपुढे सादर केला.
यावेळी राष्ट्रीय अध्यक्ष कमांडर अशोक राउत यांनी सांगितले की पेन्शनर्स सध्या मरणाअवस्थेत आहे. मृत्युदर वाढत आहे. इपीएफओ कडून दिलेली आश्वासने यामुळे पेन्शन धारकांवर सौतेला व्यवहार होत आहे. गेल्या ६ वर्षात राष्ट्रव्यापी आंदोलन केली आहेत. बुलढाणा येथे ११४३ दिवसापासून साखळी उपोषण चालू आहे. पेन्शन संदर्भात मागण्याचे व लवकर न्याय देण्याचे निवेदन केंद्रीय वित्त सचिव यांना दिले व प्रधान मंत्री नरेंद्र मोदी व खा.हेमामालिनी यांचे आभार मानले. सेन्ट्रल प्रो फंड कमिशनर शमी राव यांनी निश्चित या प्रश्नावर नव्याने विचार करून योग्य कारवाई केली जाईल असे आश्वासन दिले.
यावेळी नवी दिल्लीत पश्चिम भारत मुख्य समन्वयक सी एम देशपांडे, मुख्य समन्वयक उत्तर भारत रणजितसिंह द्सुंदी, पंजाब प्रांतीय अध्यक्ष जतिंदर वीर सिंह, पंजाब प्रांतीय समन्वयक शामलाल शर्मा, वरिष्ठ नेता ए के श्रीवास्तव, महेंद्रसिंह, पुरणसिंह व डंबर सिंह सुकुमार प्रमाणिक,अक्षय भाटीया आदी उपस्थित होते. इपीएस पेन्शनधारकांना लवकरच पेन्शनवाढ होण्याची शक्यता पश्चिम भारत संघटक सुभाष पोखरकर यांनी व्यक्त केली.
0 टिप्पण्या