राहुरी शहर/ अशोक मंडलिक : कुत्रा हा प्राणी खेडेगावात प्रत्येकाच्या घरी पाहण्यास मिळतो. अशा पाळीव प्राण्यांचे योग्य प्रकारे संगोपन केले जाते. परंतु गावात फिरणार्या कुत्र्यांकडे मात्र दुर्लक्ष केले जाते. यात अशा कुत्र्यांना आजार उद्भवल्यास सांगायला नको.
अशाच गावात फिरणार्या कुत्र्यांचा कोंढवड येथील प्राणीमित्र असलेल्या युवकांनी उपचार करून मानवतेचे दर्शन घडविले आहे. कोंढवड गावातील प्राणी प्रेमी तरुण युवक पै. ओंकार म्हसे, चैतन्य म्हसे, आकाश माळवदे, किशोर म्हसे, संतोष म्हसे, महेश म्हसे, बबलू म्हसे, गोपी म्हसे, नाना म्हसे, विकास म्हसे, विशाल म्हसे यांनी एकत्र येऊन गावातील १० ते १२ त्वचारोग झालेल्या आजारी कुत्र्यांवर डाॅ. मच्छिंद्र म्हसे यांचे सहकार्य घेऊन उपचार केले आहे.
या प्राणीप्रेमींचे कोंढवड पंचक्रोशीतील नागरिकांनी अभिनंदन करून या उपक्रमाचे कौतुक केले आहे.
1 टिप्पण्या
माणुसकीचे दुसरे नाव प्रेम आहे.
उत्तर द्याहटवाप्राणी मात्रांवर हृदयपूर्वक प्रेम करणे हीच खरी मानवता आहे...