श्रीगोंदा/ सुभाष दरेकर : तालुक्यातील हिरडगाव येथे तरूणांनी आपण समाजाचे काही तरी देण लागतो ही भावना मनात रुजवून महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती शाहू महाराज, डाॅ. बाबासाहेब आंबेडकर, आण्णाभाऊ साठे, महात्मा फुले या महामानवांचे आचार विचार तरूणांच्या मनामध्ये बिंबवण्याचा उद्देश डोळ्यासमोर ठेवून गावातील तरुण पिढीने एकत्र येऊन शौर्य प्रतिष्ठाणची स्थापना केली आहे.
आज हिरडगावातील देशसेवेत असणारे सैनिक येवले मेजर व राजेंद्र दरेकर मेजर तसेच नागवडे कारखान्याचे मा संचालक अबांदास दरेकर, सरपंच सुनिताताई दरेकर, उपसरपंच योगेश दरेकर यांच्या हस्ते या प्रतिष्ठानचे उद्घाटन करण्यात आले. कोणत्याही प्रकारचे राजकारण न करता राजकीय हेतू बाजुला ठेवून समाजातील गोरगरिबांना न्याय मिळवून देण्यासाठी, शेतकर्यांच्या प्रश्नाला वाचा फोडण्यासाठी सर्व तरुणांकडून एकत्र येत या प्रतिष्ठाणची स्थापना करण्यात आली आहे. या कार्यक्रमाचे सुत्रसंचालन अक्षय ससाणे यांनी केले व आभार गोसावी यांनी मानले.
यावेळी नागवडे कारखान्याचे मा संचालक अबांदास दरेकर, सरपंच सुनिताताई दरेकर, उपसरपंच योगेश दरेकर, भाजप नेते गंगाराम दरेकर, ग्रामपंचायत सदस्य संजय ससाणे, भाऊ काळे, सुभाष दरेकर, श्रीराम म्हस्के, शौर्य प्रतिष्ठाणचे अध्यक्ष, उपाध्यक्ष व सर्व सदस्यांसह गावातील तरुण वर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होता.
1 टिप्पण्या
👌
उत्तर द्याहटवा