देवळाली प्रवरातील घटना; प्रतिक्षा कदमचा प्रामाणिकपणा!
देवळाली प्रवरा / राजेंद्र उंडे : नलिनी संजय कदम व प्रतिक्षा संजय कदम या दोघी लगबगीने शाळेत गेल्या. शाळेतील सेवानिवृत्त मुख्याध्यापिका कमल पिसे यांच्या समोर जाऊन उभ्या ठाकल्या. पिसे यांच्या हातात दोन तोळे वजनाची सोन्याची पोत हातात ठेवली. हातातील सोन्याची पोत पाहुन पिसे यांनी गळ्याकडे पाहिले तर आपली पोत गळ्यात नाही. हातात सोन्याची पोत, डोळ्यात आश्रुच्या धारा निघालेल्या काय बोलावे हे हि समजेना कोणाला सापडले असे विचारताच प्रतिक्षास सापडले, प्रतिक्षा हि या शाळेची विद्यार्थीनी, पिसे यांनी प्रतिक्षास मायेने जवळ घेत, खुपच चांगले संस्कार तुमच्या कुटुंबीयावर झालेले आहेत. तुमच्या कुटुंबाबद्दल ऐकुन होते. पण आज माञ प्रत्यक्ष अनुभव घेतला. आई वडीलांचे चांगले संस्कारच मुलांचे जिवनमान बदलू शकते. मनात कोणतीही लालच न ठेवता हजाराचे सोने परत दिले. यावरुन कुटुंबावरच्या संस्कार समोर येतात.
मराठी शाळेच्या कदम वस्ती येथिल सेवानिवृत्त मुख्याध्यापिका कमल पिसे शाळेत आल्यानंतर कदम वस्तीवरील आंबिका देविच्या मंदिरात दर्शन करण्याचा मोह झाला. त्यांनी दर्शनास जाण्याचे ठरवले. त्यानुसार दर्शनालाही गेल्या परंतू मंदिरा समोरील कुञ्या मुळे मंदिरात दर्शनाला जाता येईना. म्हणून वस्ती वरील नलिनी संजय कदम यांना भ्रमणभाष करुन बाहेर बोलावले. परंतू नलिनी कदम यांनी आपल्या सासूबाई प्रयागाबाई यांना सेवानिवृत्त मुख्याध्यापिका पिसे यांच्याकडे पाठविले. त्यानंतर अंबिका देवीचे दर्शन घेतले आमच्या आईने मुख्याध्यापिका पिसे यांना चहाचा आग्रह केला. चहा पाणी घेताना गप्पा टप्पा झाल्या. निघताना हळदी कुंकवाचा कार्यक्रम झाल्यावर मुख्याध्यापिका यांना नलिनी कदम यांनी वाटी लावले. त्या जवळच असलेल्या शाळेत गेल्या. जाताना माञ दोन तोळे वजनाची सोन्याची पोत गळ्यातुन तुटुन बाहेरील प्रांगणातील पायरीवर पडली होती.
बऱ्याच वेळाने प्रतिक्षा बाहेर आली. त्यावेळी तिचा पाय पायरीवर पडलेल्या सोन्याच्या पोतीवर पडला. प्रतिक्षाने उचलून आपली आई नलिनी कदम यांच्याकडे दिली. नलिनी कदम यांनी हि पोत तर आपल्या घरातील कोणाचीही नाही. तर मग कोणाची असावी आज घरी तर फक्त सेवानिवृत्त मुख्याध्यापिका पिसे याच येवून गेल्या आहेत. त्यांचीच असावी असा अंदाज बांधत नलिनी यांनी प्रतिक्षाच्या बरोबर घेवून जवळच असलेली शाळा गाठली. शाळेत सेवानिवृत्त मुख्याध्यापिका बसलेल्या होत्या. नलिनी यांनी पिसे यांच्या गळ्याकडे नजर टाकली पिसे यांच्या गळ्यात सोन्याची पोथ दिसत नसल्याने नलिनीने पिसे यांच्या समोर सोन्याची पोथ धरली तसे पिसे यांनी गळ्याला हात लावला गळ्यात पोथ नसल्याने चेहऱ्यावर घाम फुटला समोर पोथ दिसते पण म्हणावे कसे असा प्रश्न पिसे समोर होता. पिसे निशब्दध बसल्या नलिनीने पिसे यांना तुमचीच सोन्याची पोथ आहे. पिसे यांच्या डोळ्यातुन आश्रु सुरु झाले होते.
काय बोलावे हे हि समजेना आणि पिसे यांच्या डोळ्या समोर दोन वर्षापुर्वीची घटना आठवली. संजय कदम यांना गवत घेण्यासाठी आलेल्या आज्जीची गळ्यातील पोत सापडली होती. त्यांनी ती त्या गरीब आज्जीस आदरतेने सन्मानपुर्वक परत केली. पिसे यांनी नलिनी व प्रतिक्षाकडे पाहुण येवढेच बोलल्या म्हणाल्या कि, खुपच चांगले संस्कार तुमच्या कुटुंबीयावर आहेत. मी फक्त ऐकले होते. पण आज साक्षात् माझ्याच बाबतीत घडल्याने हे सर्व आज माझ्या डोळ्यासमोर बघून मला खुपच आनंद झाला. असे संस्कारी कुटुंबे निर्माण झाले तर मोह निश्चितच हद्दपार झाल्या शिवाय राहणार नाही. परमेश्वर सदैव तुमच्या पाठीशी असेल असा आशिर्वाद सेवानिवृत्त मुख्याध्यापिका अर्थात गुरुनेच कदम कुटुंबाला दिला आहे.
0 टिप्पण्या