अहमदनगर जिल्हा महिला कबड्डी संघ ठाणे येथे रवाना

श्रीरामपूर (बाबासाहेब चेडे ) : ठाणे जिल्हा कबड्डी असोसिएशन आयोजित वरिष्ठ गट पुरुष व महिला महाराष्ट्र राज्य अजिंक्यपद निवड चाचणी स्पर्धा दिनांक 28 फेब्रुवारी पासून तीन मार्च दरम्यान हिंदवी युवा प्रतिष्ठान काल्हेर तालुका भिवंडी जिल्हा ठाणे येथे घेण्यात येणार आहे.

या स्पर्धेमध्ये मयूरी वाघमारे राधाबाई काळे नगर, तृप्ती विटेकर नगर, वैष्णवी आगासे नगर, शिवांजली राऊत राऊत नगर, शिंदे संस्कृती कर्जत, दिक्षा हिवराळे एमजीएम श्रीरामपूर, प्रिया गरुड स्वराज अकॅडेमी हरेगाव, ऋतुजा टिक्कल, स्नेहल चव्हाण श्रीरामपूर, अक्षदा यादव श्रीरामपूर, श्रावणी शिंदे श्रीरामपूर, मयुरी जोशी CDJ श्रीरामपूर या महिलांची निवड झालेली आहेे. त्यांना प्रशिक्षक संभाजी ढेरे व व्यवस्थापक तन्वी दुधाळ राहणार आहेत.

आज श्रीरामपूर आर बी एन बी महाविद्यालयात शिरसगावचे युवा नेते व श्रीरामपूर तालुका खरेदी-विक्री संघाचे चेअरमन गणेशराव मुदगुले, अशोकराव पवार, दत्ता जाधव, निलेश यादव, मधुकर गवारे, प्रा. सुनील गाडेकर आदी मान्यवरांनी त्यांना व प्रशिक्षक यांना शुभेच्छा देऊन ठाणे येथे होणाऱ्या स्पर्धेसाठी श्रीरामपूर येथून रवाना करण्यात आले. तसेच 12 पुरुष यांची निवड झाली आहे यांना प्रशिक्षक शंतनू पांडव व व्यवस्थापक सतीश मोरकर हे राहणार आहेत.

या संघाच्या निवड समितीचे पुरुष - प्रा बाळासाहेब कडूस, प्रा सोपान काळे, प्रा दत्ता वाकचौरे व महिला - प्रा बळीराम सातपुते व प्रा पोपट कडूस यांनी काम पाहिले. जिल्हा संघटना अध्यक्ष दादाभाऊ कळमकर सचिव प्रा. शशिकांत गाडे व सर्व पदाधिकारी यांनीही शुभेच्छा दिल्या.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या