अहमदनगर/ जावेद शेख : तात्यासाहेब कोरे वारणा साखर कारखान्याच्या चालू गळीत हंगाम कुरळप परिसरातून दोन लाख टन उसाचे गाळप झाल्याबद्दल कर्मचारी व ऊस तोड मजूर आणि जय शिवराय सभासदांच्या मदतीने उच्चांकी ऊस पुरवठा करून आदर्शवत काम केले असल्याचे मत वारणा साखर कारखान्याचे संचालक डॉ प्रताप पाटील यांनी केले.
ऐतवडे खुर्द तालुका वाळवा येथील वारणा साखर कारखाना गट क्रमांक 4 अंतर्गत ऐतवडे खुर्द कुरळप वशी लाडेगाव येलूर या परिसरातून ऊस उत्पादन उच्चांकी घाटला म्हणून गट क्रमांक 4 चे संचालक डॉ प्रताप पाटील यांनी शेती अधिकारी अक्षय तोडकर, शेती मदतनीस शिवाजी देवकर, संतोष पाटील, रघुनाथ देशपांडे, जयसिंग पानीरे यांचा सत्कार केला, त्याप्रसंगी ते बोलत होते.
वारणा साखर कारखाना अंतर्गत कुरळप परिसरातून जास्तीत जास्त ऊस कारखान्यासाठी कसा जाईल यासाठी प्रयत्नशील राहू, असेही मत त्यांनी यावेळी व्यक्त केले.
0 टिप्पण्या