याबाबत सविस्तर वृत्त असे की, बुधवार (ता.२४) संध्याकाळी दोन गटात तुंबळ हाणामारी सुरू असतांना त्यावेळी अशफाक इक्बाल शेख हा तरुण भांडण होत असलेल्या ठिकाणा वरून जात होता. यावेळी विहामांडवा येथील शेख प्यारू भंगारवाले याने अश्फाक यास लाठ्या काठ्यांनी पायाच्या पोटर्यावर व पाठीवर जबर मारहाण केली व जीवे मारण्याची धमकी दिली. तसेच भांडणात सहभागी असणारे समशेर मुनीर शेख व फय्याज मूनताज शेख यांनी देखील लाथाबुक्क्यांनी मारहाण करून शिवीगाळ केली. दरम्यान अशपाकला नातेवाईकांनी जखमी अवस्थेत पाचोड येथील ग्रामीण रुग्णालयात उपचारार्थ दाखल केले. याप्रकरणी पाचोड पोलीस ठाण्यात भा.दं.वि. कलम ३२४, ३२३, ५०४, ३४ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला असून या घटनेचा पुढील तपास पाचोड पोलीस करीत आहे.
0 टिप्पण्या