पैठण : सेहगल फाउंडेशन आणि महींद्रा कंपनी यांच्या संयुक्त विद्यमानाने पैठण तालुक्यातील ढाकेफळ परीसरातील शेतकऱ्यांसाठी यांत्रिक शेती संसाधनांचे प्रात्याक्षिक करण्यात येत आहे.
या प्रात्यक्षिकांमध्ये सध्याच्या परीस्थितीमध्ये बहुतेक शेतकरी ऊस तुटुन गेल्यावर उर्वरीत पाचट शेतात जाळुन टाकत आहे. त्यामुळे ऊसाच्या पाचटा पासुन तयार होणाऱ्या कंपोस्ट खत तसेच जमिनीत निर्माण होणाऱ्या शेंद्रीय कर्बला शेतकरी मुकला जात असल्यामुळे जमिनीची सुपीकता धोक्यात आली आहे. त्यामुळेच पाचटाची कुट्टी शेतात गाडून जमिनिची सुपीकता वाढिस लावण्याचे प्रात्यक्षिके परीसरात करत असल्याचे सेहगल फाउंडेशनचे प्रोजेक्ट कार्डीनेटर योगेश शिंगारे, फिल्ड अशीस्टंन्ट राजपाल सोनकांबळे, विष्णू खेडकर यांनी यावेळी उपस्थित शेतकरी अशोक शिसोदे, इब्राहीम शेख, अरुण कोल्हे, अनिल शिरवत, विष्णू पवार, शैलेश विर यांच्यासह अन्य शेतकऱ्यांना केले.
0 टिप्पण्या