पैठण : तालुक्यातील ७४ जळगांव येथे विविध विकास कामाचे भूमिपूजन रोजगार हमी व फलोत्पादन मंत्री संदीपान पाटील भुमरे यांच्या मार्गदनाखाली माजी अर्थ व बांधकाम सभापती विलास बापू भुमरे यांच्या हस्ते शुक्रवारी (दि.१८) रोजी संपन्न झाले.
यामध्ये ७४ जळगांव ते ढोरकिन-लोहगाव रस्ता डांबरीकरण, ड्रेनेज लाईन, पेव्हर ब्लॉक बसविणे आदी कामाचा समावेश आहे.विलास बापू भुमरे प्रतिष्ठान यांच्या वतीने आयोजित निराधारांना संजय गांधी निराधार योजना व श्रावण बाळ योजना यांच्या फाईलचे मोफत वाटप विलास बापू भुमरे यांच्या हस्ते करण्यात आले. याप्रसंगी उपजिल्हाप्रमुख विनोद पाटील बोंबले, कृषी उत्पन्न बाजार समिती संचालक भाऊ पाटील लबडे, उपतालुकाप्रमुख सतीश पाटील शेळके, मावसगव्हान सरपंच माऊली शिंदे, रमेश नवले, सुरेश लिपाने, रवींद्र थोटे, राहुल उघडे आदींची उपस्थिती होती.
हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी कृषी उत्पन्न बाजार समिती संचालक राम पाटील एरंडे, शिक्षक सेना तालुकाप्रमुख अमोल एरंडे, सरपंच गौतम सोनवणे, उपसरपंच नितीन एरंडे, ग्रामसेवक भगवान काळे, कृउबा माजी संचालक मनोहर एरंडे, व्हाईस चेअरमन हरिभाऊ घेगडे, बाळू मुळे, जनार्धन क्षीरसागर, रामभाऊ मतकर, नारायण सोनवणे, उद्धव एरंडे, बद्री गटकळ, शाळा समिती अध्यक्ष विष्णु एरंडे, बाबासाहेब मुळे, विठ्ठलराव मुळे, गणेश मुळे, संतोष मुळे, संतोष किर्जत, बबन मतकर, भाऊसाहेब साळवे, ज्ञानेश्वर नरवडे, गणेश बजारे, रामेश्वर जाधव, कल्पेश एरंडे, ज्ञानेश्वर गटकळ, संजय एरंडे, अनिल गोरे, संपत मुळे, दत्ता मुळे, संभाजी घेगडे, संतोष कदम, बबन मतकर, बिहारी पाठे, भाऊसाहेब जगधने आदींनी परिश्रम घेतले.
0 टिप्पण्या