अहमदनगर/ जावेद शेख : राहुरी तालुक्यातील पश्चिमेला असलेल्या शेरी चिखलठाण येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळा आणि शेरी अंगणवाडी येथे श्री छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती हि साध्या पद्धतीने साजरी करण्यात आली.
दरवर्षी शिवजयंतीला मोठ्या प्रमाणावर ग्रामस्थ, महिला, मुले, शिवप्रेमी हे उपस्थितीत राहून कार्यक्रमाची शोभा वाढवून शिव जयंती साजरी करतात. परंतू कोरोना लक्षात घेऊन या वेळी छत्रपती शिवरायांची जयंती हि अगदी साध्या पद्धतीने साजरी करण्यात आली. शेरी येथील शाळेतील शिक्षक, विद्यार्थी, अंगणवाडी सेविका, मदतनीस आणि लहान मुलांना घेऊन कार्यक्रम आयोजित करण्यात आला. छत्रपती शिवाजी महाराजांच्या फोटोला पुष्पहार अर्पण करून शिव स्वरात जय भवानी जय शिवाजी घोषणा करून शिव जयंती साजरी केली.
या वेळी सामाजिक कार्यकर्ते दिलीप काकडे, सागर काकडे, एकनाथ काकडे, मुख्याध्यापक वायळ सर, शिक्षक दुधावडे, अंगणवाडी सेविका मंगल काकडे, मदतनीस बिस्मिल्ला शेख, पत्रकार युनुस शेख, लोकनियुक्त सरपंच डॉ. सुभाष काकडे, राजू माळी, तंटामुक्ती अध्यक्ष संजय काकडे, माऊली गायकवाड, सोपानराव काकडे आदी शिवप्रेमींनी उपस्थित राहून जयंती साजरी केली.
0 टिप्पण्या