पाचोड /विजय चिडे : गावात गेल्या अनेक वर्षापासून अवैध दारु विक्री होत आहे. त्यामूळे महिलांना मोठ्या मानसिक त्रास सहन करावा लागत असल्याने संतप्त महिलांनी शुक्रवारी (ता.२५) रोजी सकाळी पैठण तालुक्यातील पाचोड येथील पोलिस ठाण्यात येऊन निवेदनाव्दारे अवैध दारू बंद करण्याची मागणी केली आहे.
तालुक्यातील आगलावे गेवराई (बु) होनोबाची वाडी, गेवराई खू, गेवराई बू आणि अब्दुलापूर या गावात अनधिकृत दारू विक्री होत आहे. यामूळे महिलांच्या सुखी संसाराची राखरांगोळी होत असल्याने अनेक महिलांनी पोलिस प्रशासनाच्या कार्य प्रणालीवर रोष अनावर केला आहे.
या गावातील गेल्या काही वर्षापासून दारुची बेकायदेशीर विक्री जोरात सुरू आहे. यामुळे दारूपायी तरुण पिढी व्यसनाधीन होत असुन गावात तंटे वाढले आहेत. शिवाय दारु पिऊन चौका-चौकात उभे राहणाऱ्या तळीरामांचा येथील महिलांना व शालेय विद्यार्थ्यींनीना सर्वाधिक त्रास सहन करावा लागत आहे. या गावात गेल्या अनेक वर्षापासून चार ठिकाणी पोलीसांच्या आर्शिवादाने सर्रासपणे अवैध दारुविक्री सुरु आहे.
या परिसरात अवैध देशी दारूची विक्री करून तरुण पिढी व्यसनाधीन करण्याचे काम सुरु असल्याने गावाचे स्वास्थ्य बिघडले आहे. तात्काळ येथील अवैध देशी दारू बंद करावी अन्यथा ग्रामस्थांच्या वतीने मोठे आंदोलन करण्यात येईल असा इशारा या निवेदनात देण्यात आला आहे.
यावेळी सरपंच शोभा ज्ञानदेव वाघ, उपसरपंच भिमाबाई चंद्रकांत आगळे, कासाबाई साबळे, सुमन आगळे, संगीता आगळे, उमा आगळे, जानकाबाई आगळे, नंदा वाघ, सरला आगलावे, केसरबाई गायकवाड, शोभा वाघ यांच्यासह सामाजिक कार्यकर्ते गजानंद बोहरा, नवनाथ आगळे, अंकूश आगळे, बंडू आगलावे, बालू साबळे, राजू गवारे, गजानन तरटे सह आदी गावकरी मंडळी उपस्थित होते.
गावात व तांड्यावर खुलेआम अवैद्यरीत्या हातभट्टी व देशी दारूची विक्री मोठ्या प्रमाणावर सुरू असून या दारूपाई अनेकांचे संसार उद्धवस्त झाले आहे. गावातील अवैध दारू विक्री तात्काळ बंद करण्यात यावी.
_ जानकाबाई आगलावे
दारूच्या व्यसनामुळे अनेक महिलांच्या संसाराची राखरांगोळी झाली आहे, गावातील महिलानी सुरक्षित व आदराने समाजात राहावे यासाठी गावातील दारु विक्री तत्काळ बंद होणे गरजेचे आहे.आठ दिवसात गावातील दारू विक्री बंद झाली नाही तर तीव्र आंदोलन करण्यात येईल असे
_ शोभा वाघ, सरपंच
या ठिकाणी अनेकदां पोलिसांनी कारवाई केली आहे.परंतु, या परिसरात अवैध दारू विक्री होतं असल्याने निदर्शनास आले तर त्यांनी तात्काळ पाचोड पोलिस ठाण्यांत संपर्क साधून माहीती द्यावे,विशेषतः म्हणजे माहीती देणाऱ्यांचे नाव गुपनिय ठेवले जाईल
_ गणेश सुरवसे, सहाय्यक पोलिस निरिक्षक पाचोड
0 टिप्पण्या