राहुरी / बाळकृष्ण भोसले - राहुरीतील रहिवासी संतोष सखाराम मोरे यांनी समाजमाध्यमाद्वारे खरेदी केलेल्या चारचाकी गाडीच्या फसवणूक झाल्याप्रकरणी दाखल अर्जात न्यायालयाने बँकेत जमा रक्कम परत करण्याचा आदेश दिला आहे. राहुरीतील बहुधा हा पहिलाच निकाल आहे.
या प्रकरणी सविस्तर माहिती अशी की संतोष मोरे यांनी फेसबूकवर ऑनलाइन खरेदीची नविन चार चाकी घेण्याची एैपत नसताना त्यांनी जुनी गाडी घेण्याचे ठरविले. त्यानूसार त्यांनी फेसबूक वर मारुती वँगन आर गाडी विकायला आहे अशी जाहीरात पाहिली होती. सदर जाहिरातीत असलेल्या मोबाईल वर पिडीताने संपर्क साधला असता सदर मोबाइल धारक व्यक्तीने अर्जदारास गाडीची रक्कम सांगितली. सदरची रक्कम वाजवी वाटल्याने अर्जदाराने सदरच्या व्यवहारास संमती दिली त्यानंतर अर्जदारास सदर अनोळखी व्यक्तीने गाडीचे आर.सी. पुस्तक व इतर कागदपत्रे पाठविली, त्यामुळे पिडीताला या सर्व व्यवहाराची खात्री पटली अन् त्याने व्यवहारात ठरलेली रक्कम सदरील व्यक्तीस ऑनलाइन पद्धतीने पाठविली. मात्र सर्व रक्कम पोहच झाली तरी सदरील गाडीची अर्जदाराने वाट पाहूनही सदरील गाडी मात्र अर्जदारास पोहच झाली नाही. त्यानंतर अर्जदाराने सदर व्यक्तिशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला मात्र त्यांचा फोन बंद असल्याचे निदर्शनास आलेे. त्या वेळेस अर्जदाराने स्वतः ची फसवणूक झाल्याचे निदर्शनास आल्यानंतर त्यांनी अहमदनगर सायबर पोलीस स्टेशन यांचेकडे ऑनलाइन फसवणूक झाल्याबाबतची तक्रार केली. त्यावेळी सायबर पोलीस यांनी सदरील रकमेचा शोध घेतला व सदरील रक्कम हि पंजाब नॅशनल बँक शाखा जुहेरा जिल्हा भरतपूर राज्य राजस्थान या बँकेत रक्कम असलेचे त्यांच्या निदर्शनास आले व त्यांनी सदर रक्कम ही फ्रिज करुन ठेवली.
त्या नूसार सदर रक्कम मिळणेसाठी अर्जदाराने राहूरी येथील न्यायालयात जेष्ठ विधिज्ञ व नोटरी पब्लिक ॲड. प्रकाश संसारे यांचे मार्फत अर्ज क्रमांक २३५/२१ अन्वये राहुरी येथील मुख्य न्यायाधीश मा. श्रीमती ए. एस. वाडकर यांनी दिनांक ५ फेब्रुवारी २०२३ रोजी पिडीतास सदर ऑनलाइन गाडी खरेदीची फसवणूकीतील फ्रिज झालेली रक्कम हि पंजाब नॅशनल बँक शाखा जुहेरा जिल्हा भरतपूर राज्य राजस्थान येथील बँकेतून रक्कम परत देण्याचा आदेश केला आहे.
0 टिप्पण्या