अहमदनगर/ जावेद शेख : संत गाडगे बाबा महाराज जंयती तसेच अमित काळभोर यांच्या वाढदिवसानिमित्त लोणी काळभोर जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत मा. उपसभापती सनी काळभोर, लोणी काळभोर सरपंच राजाराम बापू काळभोर यांच्या हस्ते वृक्षारोपण करण्यात आले.
यावेळी ग्रीन फाउंडेशन संस्थेस ठिंबक सिंचनाचे 2 बंडल देण्यात आले. याप्रसंगी भरत काळभोर, नागेश काळभोर, राजेंद्रआबा काळभोर, युवराज काळभोर, सचिन काळभोर, उध्दव कदम, सागर काळभोर, अमित जगताप, दत्तात्रय शेंडगे, दिगंबर जगताप, बाबासाहेब यादव, बिरूदेव भास्कर तसेच ग्रीन फाउंडेशनचे सदस्य, जिल्हा परिषद प्राथमिक शाळा शिक्षक- विद्यार्थी, लोणी काळभोर ग्रामपंचायत सदस्य, लोणी काळभोर ग्रामस्थ उपस्थित होते.
याप्रसंगी राजेंद्रआबा काळभोर यांनी संत गाडगे महाराज यांच्या बद्दल महिती दिली. ग्रीन फाऊंडेशनचे संस्थापक अध्यक्ष यांनी उपस्थित मान्यवरांचे आभार मानले तर हवेली तालुका संपर्क प्रमुख बाबासाहेब यादव यांनी सूत्रसंचालन केले.
0 टिप्पण्या