हरेगाव येथे छत्रपती शिवाजी महाराज जयंती मोठ्या उत्साहात साजरी

श्रीरामपूर / बाबासाहेब चेडे : हरेगाव येथे छत्रपती शिवाजी महाराज जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. यावेळी प्रमुख उपस्थिती जिल्हा परिषद उर्दू शाळेचे मुख्याध्यापक मोहंमद बादर शेख, ग्रा. प.सदस्य सुनिल शिनगारे, संजय महाले, भारतीय बौद्ध महासभेचे अध्यक्ष संतोष बनसोडे, रमेश शेळके, सागर कुलथे, अमोल बागुल, बाळू आदिक, चंदू शेलार, आशिष गडवे, अविनाश धनेधर, रमेश शिंदे, बाळू त्रिभुवन, ज्योती बाणाइत, कु. संस्कृती नावगिरे, छोटी वाहुल, कृष्णा अभंग, भोसले, जाधव आदी उपस्थित होते.

जयंती उत्सवाचे आयोजन व प्रस्थविक मा. ग्रा. सदस्य दिपक नवगिरे यांनी केले. यावेळी सुनिल शिनगारे यांनी अभिवादन करून सर्वाना शुभेच्छा दिल्या व उपस्थित सर्वांना मिठाईचे वाटप करण्यात आले.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या