त्रिदलच्या वतीने श्रीरामपूर शहरात आजी, माजी सैनिकांचा मेळावा संपन्न

अहमदनगर/ जावेद शेख : शिव पार्वती मंगल कार्यालयात त्रिदल सैनिक संघटनेच्या वतीने सैनिकांच्या विविध ज्वलंत प्रश्नांविषयी घेण्यात आलेला सैनिक, माजी सैनिकांचा मेळावा अत्यंत खेळीमेळीच्या वातावरणात संपन्न झाला.

कोरोना सारख्या गंभीर स्वरूपाची साथ देशात सुरु असल्याने अनेक दिवसांपासून मेळावा झाला नव्हता. त्यामुळे अनेक आजी/ माजी सैनिकांचे प्रश्न प्रलंबित होते. त्यातच जिल्हा प्रशासनाच्या वतीने दि. ८ फेब्रुवारी रोजी अमृत जवान सन्मान अभियान सुरुवात झाले आहे त्यामधूनही काही प्रश्न प्रलंबित होते ते प्रश्न मार्गी लावण्यासाठी हस्तलिखित अमृत जवान अभियानाचा अर्ज भरून घेण्यात आला व संबंधित तक्रारी चे कागदपत्रे संघटनेकडे जमा करून घेण्यात आले. संघटनेच्या मेळाव्यात संघटन मजबुती करणासाठी चर्चासत्रही आयोजित करण्यात आले होते. याप्रसंगी त्रिदल सैनिक सेवा संघाचे अहमदनगर उत्तर विभागाचे उपाध्यक्ष मेजर कृष्णा सरदार यांनी संघटनेचे महत्व पटवून सांगितले संघटनेने सभासदांकडून घेतलेल्या पैशांचा हिशोब व्यवस्थित ठेवून तो सभासदांना वेळोवेळी सांगणे किंवा दाखवणे यासारखे पवित्र कार्य नाही तसेच या सार्वजनिक पैशांचा अपहार करणे यासारखे कृत्य करून सभासदांची फसवणूक व संघटनेची बदनामी करून घेऊ नये संघटनेची ताकद ही केवळ सभासदांच्या संख्येवर अवलंबून नसून सभासदांच्या प्रामाणिकपणावर आणि एकनिष्ठतेवर देखील अवलंबून असते असे ते म्हणाले. याप्रसंगी त्रिदल सैनिक सेवा संघाचे तालुकाध्यक्ष अनिल लगड यांनी आपल्या मनोगतात एकसंघ रहाणे आणि भविष्यात शहिद स्मारकाच्या जागेसाठी तीव्र पद्धतीचा लढा देणे गरजेचे आहेे. आपल्यावर होत असलेल्या अन्यायाबाबत निम्या रात्री तुम्ही आवाज द्या संघटना तुमच्या साठी हजर राहील असे म्हणाले. याप्रसंगी नुकतेच सेवानिवृत्त झालेले माजी सैनिक रवींद्र कुलकर्णी, अमित देशमुख, प्रदिपकुमार यादव यांचा त्रिदल संघटनेच्या माध्यमातून यथोचित सत्कार करण्यात आलाा.
या मेळाव्यास अहमदनगर उत्तरचे उपाध्यक्ष मेजर कृष्णा सरदार, तालुका अध्यक्ष अनिल लगड, महिला अध्यक्षा छायाताई मोटे, संग्राम यादव, बाळासाहेब कडनोर, रवींद्र कुलकर्णी, मंगेश यादव, बाळासाहेब बनकर, रवींद्र राऊत, संतोष देवराय, सुनील भालेराव, अमित देशमुख, विजय कुलकर्णी, सी.आर. धाकतोडे, सुनील आढाव, सोमनाथ ताके, दादासाहेब जगताप, सोपान अमराव, भागीरथ पवार, सय्यद गुलाब बक्ष, कैलास खंडागळे इत्यादी आजी/ माजी, वीर पत्नी, वीर माता, वीर पिता, विधवा पत्नी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या