मी घरचा मंत्री आहे, माझ्या माध्यमातुन विकास कामे करून घ्या- कॅबिनेट मंत्री भुमरे


पैठण : मी आपल्या घरचा मंत्री आहे, माझ्या माध्यमातुन पैठण तालुक्यातील सरपंच तसेच गावपातळीवरील छोट्या मोठ्या कार्यकर्त्यांनी आणि शेतकऱ्यांनी आपल्या गावातील विविध विकासकामे करुन घ्यावेत अशी भावना राज्याचे रोजगार हमी तथा फलोत्पादन कॅबीनेट मंत्री संदीपान भुमरे यांनी व्यक्त केली.

पैठण तालुक्यातील तारुपिंपळवाडी येथे विविध विकास कामांचे भुमीपुजन व लोकार्पण तसेच खुल्या हाॅलीबाॅल स्पर्धांचे उद्घाटन कॅबिनेट मंत्री संदिपान भुमरे, आदीनाथ महाराज ताराकेश्वर, शिवसेना जिल्हा उपप्रमुख विनोद बोंबले यांच्या हस्ते शनिवारी (दि.२७ फेब्रुवारी) सांयकाळी करण्यात आले. याप्रसंगी ते बोलत होते.

शिवशक्ती स्पोर्ट क्लब तारुपिंपळवाडी यांच्या वतिने आयोजीत भव्य हाॅलिबाॅल स्पर्धेमध्ये बक्षिस योगदान सहभागासाठी जिल्हा परीषद माजी बांधकाम सभापती विलास भुमरे, माजी सरपंच गणेश ईथापे, तारु पिंपळवाडीचे सरपंच शिवाजी कनसे, ग्रामसेवक सुहास पाटील खाटीक, दिलिप जगताप, ज्ञानेश्वर शिंदे, जमादार, दत्तात्रय थोटे, काकासाहेब थोटे यांनी भरीव अर्थिक योगदान दिले आहे.

या भव्य हाॅलिबाॅल स्पर्धेच्या उद्घाटन तसेच विविध विकास कामांच्या भुमीपुजन व लोकार्पण सोहळ्याप्रसंगी शिवसेना जिल्हा उपप्रमुख विनोद बोंबले, जिल्हा परीषद सदस्य साईनाथ सोलाट, छावाचे जिल्हाध्यक्ष किशोर शिरवत, सरपंच शिवाजी कनसे, सतिश शेळके, उपतालुकाप्रमुख मनोज पेरे, रोहीतदादा थोटे, रामदास थोटे, ग्रामसेवक सुहास पाटील, निलेश ईथापे, दादासाहेब थोटे, नामदेव औटे, राजु कदम, रावसाहेब बोरुडे, कैलास शिंदे, , संजय मरकड, मनेश आव्हाड, अशोक थोटे, अनिल ढोकळे, सुधिर आव्हाड, आदम सय्यद यांच्यासह शिवसेना पदाधिकारी व हाॅलिबाॅल खेळाडू तसेच नागरीक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या