राहुरी / बाळकृष्ण भोसले - श्री संत सावता माळी युवक संघाच्या राहुरी तालुका अध्यक्षपदी शामराव पाटील अंत्रे तर उपाध्यक्षपदी विकी भुजबळ यांची नियुक्ती करण्यात आली.
गंगापूर माळेवाडी येथील संत शिरोमणी सावता महाराज मदिंर येथे श्री संत सावता माळी युवक संघ महाराष्ट्र राज्याचे संस्थापक अध्यक्ष सचिन गुलदगड, सचिव सुनिल गुलदगड, अहमदनगर दक्षिण जिल्हाध्यक्ष अशोकराव तुपे, सागर कुदळे, हर्षल राऊत आदींच्या उपस्थितीत नवनियुक्त पदाधिकाऱ्यांना नियुक्ती पत्र देण्यात आली. प्रसंगी प्रदेश सचिव सुनिल गुलदगड मार्गदर्शन करताना म्हणाले संघटना स्थापनेपासून दोन्ही पदाधिकारी यांनी सक्रिय कार्यकर्ता म्हणून काम केली. यापुढे जी जबाबदारी सोपवण्यात आली ती योग्य पध्दतीने व सामाजिक न्याय देण्याचा प्रयत्न करावा. गाव तेथे शाखा उघडण्याची जबाबदारी स्वीकारून सामाजिक उपक्रम राबविण्यात यावेत अशी अपेक्षा व्यक्त केली.
शामराव अंत्रे प्रसंगी बोलताना म्हणाले श्री संत सावता माळी युवक संघ महाराष्ट्र प्रदेश कमिटीने ज्या विश्वासाने राहुरी तालुकाध्यक्ष जबाबदारी सोपवण्यात आली ती योग्य पध्दतीने व सर्वांना बरोबर घेऊन तालुक्यात माळी समाज बांधवांना एकत्रितपणे संघटन करून गाव तेथे श्री संत सावता माळी युवक संघ शाखा स्थापन करण्याचा प्रयत्न करणार आहे. विकी भुजबळ यांनी उपाध्यक्ष पद नियुक्ती स्विकारताना आज पर्यंत संघटनेत सक्रिय कार्यकर्ता म्हणून काम केले हि नियुक्तीने एक नवी उमेद निर्माण झाली असून यापुढे तळागाळातील लोकांपर्यंत पोहोचत संघटन करून संघटना घराघरात पोहचली पाहिजे या साठी अहोरात्र मेहनत घेण्याचे सांगितले.
प्रसंगी ओंकार भुजबळ, साईनाथ भुजबळ, प्रभाकर कातोरे, नितीन शिंदे, महेश भुजबळ, तुषार गाडेकर, सचिन शिंदे, माऊली भुजबळ, ज्ञानेश्वर भुजबळ, मुकेश भुजबळ, प्रविण भुजबळ, शिवाजी भुजबळ, राहुल शिंदे, प्रसाद भुजबळ आदी उपस्थित होते.
0 टिप्पण्या