श्रीरामपूर / बाबासाहेब चेडे : सिने दिग्दर्शक अलका कुबल प्रेरित भुमी फौंडेशन महाराष्ट्र राज्य ही सामाजिक संस्था गेल्या अनेक वर्षापासून सामाजिक क्षेत्रात उत्कृष्ट कार्य करत अनेक उपक्रम राबवत असते. त्याचाच एक भाग म्हणुन संस्थापक अध्यक्ष प्रा. कैलास पवार यांच्या संकल्पनेतुन श्रीरामपुर तालुक्यातील कोरोना महामारीमुळे विधवा झालेल्या तालुक्यातील ग्रामीण 100 गरजु निराधार महिलांना संस्थेच्या माध्यमातुन मोफत शेळी वाटप हा उपक्रम हाती घेतला आहे.
तरी गरजु महिलांनी भिमराज चांगदेव बागुल मु.पो. हरिगांव /उंदिरगांव ( आऊटसाईट ) ता. श्रीरामपूर जि. अहमदनगर. पिन.413718 फोन नं.9822043740 व कचरू महांकाळे मोबाईल क्र 8459050515 वर संपर्क करावा व रेशन कार्ड, आधार कार्ड व कोरोनामुळे मृत दाखला आदी आवश्यक दाखले द्यावीत असे आवाहन संस्थेच्या वतीने करण्यात आले आहे.
0 टिप्पण्या