संगमनेर तालुका शेळीमेंढी पालन संस्थेच्या उपाध्यक्षपदी देवराम गुळवे

राहुरी / बाळकृष्ण भोसले - अहमदनगर जिल्ह्यातील प्रसिद्ध अशा संगमनेर तालुका शेळी मेंढी पालन सहकारी संस्थेच्या उपाध्यक्षपदी नरवीर उमाजी नाईक समाज सुधारक मंडळाचे राज्य प्रवक्ते देवराम किसन गुळवे यांची नुकतीच एकमताने निवड करण्यात आली आहे.

महाराष्ट्र राज्याचे महसूल मंत्री नामदार बाळासाहेब थोरात यांच्या मार्गदर्शनाखाली व महानंदाचे चेअरमन रणजीतसिंह देशमुख व आमदार डॉ.सुधीर तांबे यांच्या सहकार्याने संगमनेर तालुक्यात विविध सहकारी संस्था प्रगतीपथावर सुरू असून अशा या संस्थांपैकी संगमनेर तालुका शेळी मेंढी पालन सहकारी संस्था आहे. या संस्थेच्या अध्यक्ष, उपाध्यक्ष निवडी करण्यात आल्या, यामध्ये अध्यक्ष म्हणून कनोली येथील डॉ. चव्हाण यांची निवड करण्यात आली तर उपाध्यक्षपदी नरवीर उमाजी नाईक समाज सुधारक मंडळाचे राज्य प्रवक्ते देवराम किसन गुळवे यांची एकमताने निवड करण्यात आली. नामदार बाळासाहेब थोरात यांच्या मार्गदर्शनाखाली ही निवड झाली. त्यामुळे देवराम गुळवे यांचे नरवीर उमाजी नाईक समाज सुधारक मंडळाच्या वतीने ठिकठिकाणी स्वागत व सत्कार होत आहेत.

संगमनेर तालुका शेळी मेंढी पालन सहकारी संस्थेच्या अध्यक्षपदी डॉ. चव्हाण व उपाध्यक्षपदी देवराम गुळवे यांची निवड झाल्याबद्दल नामदार बाळासाहेब थोरात, महानंदाचे चेअरमन रणजितसिंह देशमुख, आमदार डॉक्टर सुधीर तांबे, संगमनेर तालुका कुक्कुटपालन सहकारी संस्थेचे चेअरमन भिमाजी बोराडे, नरवीर उमाजी नाईक समाज सुधारक मंडळाचे प्रदेशाध्यक्ष वसंतराव चव्हाण, राज्य सरचिटणीस राजकुमार गडकरी, बंडोपंत खर्डे गुरुजी, जिल्हाध्यक्ष संजय शिरतार, संगमनेर तालुका अध्यक्ष संजय चव्हाण, सुभाष जेडगुले, शिवाजी गडकरी, बाळासाहेब भिमाजी बोराडे, राजू गुरूकुले, सिताराम जेडगुले, आदीसह संघटनेच्या पदाधिकाऱ्यांसह सुभाष सानप, तसेच कऱ्हे ग्रामस्थ, त्याचप्रमाणे संगमनेर तालुक्यातील अहमदनगर जिल्ह्यातील काँग्रेसचे पदाधिकारी नेते यांनी अभिनंदन केले आहे. व समाजाला तालुक्‍यातील एका चांगल्या संस्थेवर काम करण्याची संधी दिली. त्याबद्दल नामदार थोरात यांचे नरवीर उमाजी नाईक समाज सुधारक मंडळाच्या वतीने आभार मानत क्रांतिकारी रामोशी समाजाच्या वतीने ना. थोरात यांना धन्यवाद देण्यात येत आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या