संभाजीराजे यांच्या आंदोलनाच्या समर्थनार्थ पैठण येथे उद्या चक्काजाम

समाज बांधवांनी मोठ्या सहभागी व्हावे

◾सकल मराठा समाजाच्या वतीने आवाहन

विलास लाटे/पैठण : छत्रपती युवराज संभाजीराजे भोसले यांनी मराठा समाजाच्या मागण्यासाठी मुंबई येथील आझाद मैदानात आमरण उपोषणास बसले आहेत. मात्र, तीन दिवसांपासून सुरू असलेल्या या आंदोलनाची शासनाने गांभीर्याने दखल घेतली नसून, छ्त्रपती युवराज संभाजीराजे यांना पाठिंबा व शासनाने आंदोलनाची दखल घ्यावी यासाठी सकल मराठा समाज पैठण तालुक्याच्या वतीने मंगळवारी (दि.१ मार्च) सह्याद्री चौक, पाचोड नाका येथे सकाळी नऊ वाजता चक्काजाम आंदोलन करण्यात येणार आहे. 

या आंदोलनात सर्व समाज बांधवांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे असे आवाहन सकल मराठा समाजाच्या वतीने करण्यात आले आहे. दरम्यान याप्रसंगी फक्त शेतीमाल व अत्यावश्यक सेवेमधील वाहने वगळता इतर सर्व वाहने अडविण्यात येणार असल्याचे आयोजकांच्या वतीने सांगण्यात आले.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या