प्रा. विजय कमळे पाटील नेट परीक्षा उत्तीर्ण

अहमदनगर/ जावेद शेख : भारत जनसंवाद व वृत्तपत्रविद्या महाविद्यालयाचे प्रभारी प्राचार्य व न्युज 18 लोकमत वृत्तवाहिनीचे जिल्हा प्रतिनिधी प्रा. विजय कमळे पाटील यांनी राष्ट्रीय पात्रता चाचणी अर्थात नेट परीक्षा उत्तीर्ण केलीय.

पत्रकारिता व जनसंवाद विषयात त्यांनी हे यश संपादन केले. राज्य पात्रता चाचणी अर्थात सेट परीक्षेत त्यांनी यापूर्वीच यश संपादन केलेले असून ते सध्या औरंगाबाद येथील एमजीएम विद्यापीठातून प्रा.डॉ. आशा माने - देशपांडे यांच्या मार्गदर्शनाखाली पत्रकार संरक्षण संदर्भातील कायदा - स्वरूप व आव्हाने या विषयावर पीएचडी देखील करीत आहेत. त्यांच्या या यशाबद्दल त्यांचे सर्वत्र अभिनंदन व कौतुक होत आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या