एकूलत्या एक तरुणाचा पाण्यात बुडून दुर्दैवी मृत्यू

मयत अमोल ईथापे

◾आई, बहिण, आजी, आजोबाचा आधार गेला.

क्रांतीनामा न्युज/ पैठण : तालुक्यातील लामगव्हाण परिसरात एकूलत्या एक तरुणाचा जायकवाडी धरणाच्या फुगवटा क्षेत्रातील पाण्यात बुडून मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली असुन मृत तरुणाचे अमोल सुनिल इथापे (वय २०) असे नाव आहे.

        पैठण तालुक्यातील लोहगाव येथिल शुभम इथापे, दत्ता बोरुडे, अमोल इथापे हे तीन तरुण मित्र दुचाकीवरून लामगव्हाण परिसरात बॅकवाटरच्या पाण्यात उतरले असता अमोल हा एका ठिकाणी खोल पाण्यात बुडाला. इतरांनी त्याला वाचवण्यासाठी प्रयत्न केले पण यश आले नाही. घटनेची माहीती एका मित्राने इतरांना कळवल्यावर लामगव्हाण येथिल काहींनी शोध घेऊन डिग्गीच्या सहाय्याने अमोलला वर काढले. अमोलचे चुलते गणेश इथापे यांनी त्याला बिडकीन ग्रामिण रुग्णालयात उपचारासाठी आणले असता डाॅक्टरांनी तपासुन मृत घोषित केले. अद्याप मृत्यूचे कारण समजु शकले नसुन शवविच्छेन झाल्यावरच नेमके कारण समजुन येणार आहे. वैद्यकीय अधिकाऱ्यांच्या खबरीवरुन बिडकीन पोलिस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद घेण्यात आली. सदर घटनेचा पुढील तपास सपोनि संतोष माने यांच्या मार्गदर्शनाखाली पोहेकाँ सोमनाथ तांगडे, शिवानंद बणगे हे करित आहे. 

     अमोल हा एकूलता एक होता व लहानपणीच वडिलांची छत्र छाया हरपली होती. तो कुटुंबातील आई, बहीण, आजी, आजोबा यांचा आधार होता. तो आधारच गेल्यामुळे सर्वत्र हळहळ व्यक्त होत असुन शोककळा पसरली.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या