राहुरी / बाळकृष्ण भोसले - युवा कार्यक्रम व क्रीडा मंत्रालय भारत सरकार यांच्या अंतर्गत राष्ट्रीय सेवा योजनेचे राष्ट्रीय एकात्मता शिबिर (NIC) कर्नाटक विश्वविद्यालय, धारवाड, कर्नाटक येथे दिनांक २१ ते २७ फेब्रुवारी २०२२ दरम्यान होत आहे. या राष्ट्रीय एकात्मता शिबिरामध्ये तालुक्यातील सात्रळ येथील पद्मभूषण डॉ. बाळासाहेब विखे पाटील प्रवरा ग्रामीण शिक्षण संस्थेचे कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयाचा राष्ट्रीय सेवा योजनेचा स्वयंसेवक शादाब राजू इनामदार राहणार दाढ बु. हा महाराष्ट्र राज्याचे प्रतिनिधित्व करणार आहे. या शिबिरासाठी पुणे विद्यापीठांमधून ५ स्वयंसेवक व ५ स्वयंसेविका सहभागी होत आहेत. महाविद्यालयाच्या दृष्टीने ही अभिमानास्पद बाब असून त्याचे विविध स्तरातून कौतुक होत आहे.
या उल्लेखनीय यशाबद्दल संस्थेचे अध्यक्ष मा. मंत्री व विधानसभा सदस्य राधाकृष्ण विखे पाटील, माजी मंत्री अण्णासाहेब म्हस्के, माजी जि.प. अध्यक्षा सौ. शालिनीताई विखे पाटील, युवा नेते खासदार डॉ. सुजय विखे पाटील, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. शिवानंद हिरेमठ, सहसचिव भारत घोगरे, महाविद्यालय विकास समितीचे सर्व पदाधिकारी, महाविद्यालयाच्या प्र. प्राचार्या प्रा. जयश्री सिनगर, उपप्राचार्य प्रो. (डाॅ.) सोमनाथ घोलप, उपप्राचार्य प्रा. दीपक घोलप, कार्यक्रम अधिकारी प्रा. रोहित भडकवाड, प्रा.वैभव दिघे, डॉ. नीलेश कान्हे, डॉ. रामदास बोरसे सर्व प्राध्यापक व कर्मचारी वृंद यांनी अभिनंदन केले आहे.
0 टिप्पण्या