पैठण : पैठण तालुक्यातील ढोरकीन येथील गुरुकिल्ली कोचिंग क्लासेस मध्ये (ता.१९) रोजी शिवजयंती उत्साहात साजरी करण्यात आली.
क्लासेस तर्फे 'शिवरायांचे बालपण' या विषयावर इयत्ता चौथी ते दहावीच्या विद्यार्थ्यांची वक्तृत्व स्पर्धा घेण्यात आली. या प्रसंगी राजेंद्र राखे यांनी प्रास्ताविक केले. क्लासचा विद्यार्थी नकुल भडके याने सूत्रसंचालन केले. अक्षरा मुळे, श्रुती मुळे, अक्षरा भावले, स्वरा मुळे, प्रणव भावले, आदित्य भवर, गणेश भावले, अंश इंदोरे, शेखर इंदोरे, अरीहंत भुस, विवेक भावले, प्रतीक नवले, प्रमोद थोरात, साक्षी मुळे, वैष्णवी वाघमारे या विद्यार्थ्यांनी उत्कृष्ट भाषणे दिली.
यावेळी गुरुकिल्ली क्लासेसचे राजेंद्र राखे तसेच शेखर इंदोरे, सचिन थोरात, अनिरुद्ध कुलकर्णी आदी मान्यवर उपस्थित होते.
0 टिप्पण्या